बापरे; एक सामना अन् खेळाडूने कमावले ७४३ कोटी, इथे विराट कोहली वर्षाला कमावतो २०० कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:34 PM2021-06-29T12:34:59+5:302021-06-29T12:37:44+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा जगातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याचं स्टायलिश आयुष्य सर्वांना मोहीत करते.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा जगातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याचं स्टायलिश आयुष्य सर्वांना मोहीत करते. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये तो आघाडीवर आहे आणि फोर्ब्सच्या माहितीनुसार तो वर्षाला जवळपास २०० कोटी रुपये कमावतो. पण, एका खेळाडूनं फक्त एक सामना खेळून विराटच्या वार्षिक कमाईच्या तीनपट कमाई केली आहे.

अमेरिकेचा महान प्रोफेशनल बॉक्सर फ्लॉयड मेवेदर ( Floyd Mayweather) यानं काल एका दिवसात ७४३ कोटी रुपये कमावले. मेवेदर यानं स्वतः इस्टाग्रामवरून ही माहिती दिली. त्यानं मागील महिन्यात यूट्यूबर लॉगन पॉल याच्यासोबत झालेल्या सामन्यातून १०० मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४३ कोटी रुपये कमावले.

पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मेवेदर व पॉल यांच्यातील लढत नकली होती. मेवेदरनं स्वतः या गोष्टीचा खुलासा केला. मेवेदरचा एक व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात तो स्वतः सांगतोय की नकली लढतीतून त्यानं ही रक्कम कमावली आहे.

मेवेदर आणि लॉगन पॉल यांच्यात ६ जूनला हा सामना झाला होता. हा सामना ८ राऊंड चालला आणि मेवेदर यूट्यूबर पॉलला नॉक आऊट करू शकला नाही. या सामन्यानंतर मेवेदरवर टीका झाली होती. पण, त्याला याची पर्वा नाही.

मेवेदरनं त्याच्या कारकीर्दित एकही सामना गमावलेला नाही. २०१७मध्ये त्यानं निवृत्ती जाहीर केली आणि त्यानं कारकीर्दित ५० सामने जिंकले आहेत.

मेवेदरनं २०२०त ४५० मिलियन डॉलर कमावले होते. पण, त्यानं दावा केला होता की याचवर्षी त्यानं ८९.१३ अरब रुपये कमावले आहेत.

मेवेदरकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. बुगाती ग्रँड स्पोर्ट, बुगाती वेरॉन, लँम्बॉर्गीनी एवॅटेडॉर, फेरारी ५९९ जीटीबी फियोरानो अशा अनेक गाड्या आहेत.

मेवेदरकडे ३३४ कोटींचे प्रायव्हेट जेटही आहे.

तो ५० कोटींचं घड्याळ घालतो.

Read in English