Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : रवी दहियाच्या पदकानं नाहरी गावाचं नशीब पालटणार; हॉस्पिटल, वीज येणार, जाणून घ्या या पदकाचं मोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:38 PM2021-08-04T16:38:28+5:302021-08-04T16:41:21+5:30

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियानं अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला.

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियानं अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला.

उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं झाकिस्तानच्या नुरीस्लॅम सानायेव्ह याची कडवी झुंज मोडून काढली. रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१२नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे

रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-३ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली.

कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले.

हा विजय भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे नक्कीच आहे, परंतु रवी दहियाच्या गावकऱ्यांसाठी उज्ज्व स्वप्न दाखवणारे आहे. दहिया ऑलिम्पिक पदक घेऊन जाणार हे निश्चितच आहे आणि त्याच्या या पदकानंतर गावात हॉस्पिटल उभे राहिल, वीजेची समस्या दूर होईल अशी आशा गावकऱ्यांना वाटत आहे. ( With the Olympics medal sealed, Ravi Dahiya’s father Rakesh and the villagers of Nahari, Haryana now hope that their long-standing demand of a hospital and regular electricity supply will be fulfilled.)

हरयाणातील सोनीपत हाय वे येथून १० किलोमीटर अंतरावर नाहरी हे गाव आहे. या गावानं आतापर्यंत देशाला तीन ऑलिम्पिकपटू दिले. महावीर सिंग ( १९८० मॉक्सो, १९८४ लॉस अँजेलिस) आणि अमित दहिया ( २०१२ लंडन) यांच्यानंतर रवी हा तिसरा ऑलिम्पिकपटू आहे. ( The quiet and shy Ravi, son of a farmer, is the third Olympian to emerge from this village after Mahavir Singh (1980 Moscow, 1984 Los Angeles) and Amit Dahiya (London 2012).)

आता पदक येणार हे निश्चित आहे. त्याचसोबत हॉस्पिटलही बनेल असा विश्वास आहे. गावकऱ्यांना नियमित पाणी व वीजही मिळत नाही. आता हे सर्व बदलेल असा विश्वास रवीचे वडील राकेश यांनी व्यक्त केला आहे.

सोनीपत हायवेपासून १० किमी अंतरावर असलेल्या या गावात दिवसाला फक्त दोन तास आणि रात्री सहा तासच वीज असते. महावीर सिंग यांनी दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवी लाल चौधरी यांच्याकडे प्राण्यांसाठीच्या हॉस्पिटलची मागणी केली होती आणि ती मान्य झाली.

रवी कुमार दहियाच्या ऑलिम्पिक पदकाचं मोल या गावकऱ्यांसाठी अधिक आहे.