हे भारतीय अ‍ॅथलिट सोशल मीडियावर आहेत मोठे स्टार, फॅन फॉलोविंग पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 04:58 PM2021-12-31T16:58:42+5:302021-12-31T17:02:12+5:30

Indian athletes: भारतामध्ये महिला अ‍ॅथलिटना नेहमीच केवळ एक अ‍ॅथलिट म्हणून पाहिले जाते. मात्र सोशल मीडियाचे आगमन झाल्यापासून या खेळाडूंनाही प्रसिद्धीचे वलय मिळू लागले आहे. तसेच खेळाडू आता स्वत:ला आर्थिकदृष्टा सक्षम बनवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

भारतामध्ये महिला अ‍ॅथलिटना नेहमीच केवळ एक अ‍ॅथलिट म्हणून पाहिले जाते. मात्र सोशल मीडियाचे आगमन झाल्यापासून या खेळाडूंनाही प्रसिद्धीचे वलय मिळू लागले आहे. तसेच खेळाडू आता स्वत:ला आर्थिकदृष्टा सक्षम बनवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

१५००मी धावण्याच्या स्पर्धेतील भारताची नॅशनल चॅम्पियन आणि रेकॉर्ड होल्डर हरमिलन बैंस यांनी सोशल मीडियावर आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. तिथे तिचा स्टायलिश अवतार दिसून येतो. त्यामुळेच इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या एक लाखांपेक्षाही अधिक आहे. तसेच नेहमीच ती वृत्तपत्रे आणि अनेक वेबसाइट्सच्या लाइफस्टाइल सेक्शनमध्येही दिसत आहे.

भारताची ज्युनियर बॉक्सर सिमरन वर्मा ही सुद्धा इन्स्टाग्राम फॉलोविंगच्याबाबतीत खूप पुढे आहे. १७ वर्षांची ही खेळाडू ज्युनियर नॅशनल चॅम्पियन आहे. तिचे २६ हजार ८ हजार फॉलोवर आहेत. त्यांची सोशल मीडिया प्रोफाइलवर तुम्हाला तिचे अनेक ग्लॅमरस फोटो दिसतील.

२६ वर्षांच्या निहारिका वशिष्ठ हिने ट्रिपल जम्पमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. मात्र तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर असं यश मिळवता आलं नाही. मात्र तरीही सोशल मीडियावरील तिची फॅन फॉलोविंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. निहारिकाचे एक लाख ५ हजार फॅन फॉलोविंग आहे. तसेच तिला अक्षय कुमारसोबत अॅड करण्याची संधीही मिळाली होती.

नीरज चोप्राचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर सुमारे १० लाख फॉलोअर्स होते. मात्र ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर २४ तासात त्याच्या फॅन्सची संख्या २५ लाखांपर्यंत पोहचली. तसेच सध्या त्याचे तब्बल ५० लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर नीरज चोप्रा आता मोठा स्टार झाला आहे. तसेच त्या माध्यमातून तो घसघशीत कमाईही करतो.