शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 1:04 PM

1 / 10
बास्केटबॉलपटू शकिल ओ'नील यानं पत्नी शॉनीसह 9 वर्षांचा संसार सामंजस्यानं मोडण्याचा निर्णय घेतला. पण, त्यासाठी त्याला महिन्याला 15,34,080 इतकी रक्कम शॉनीला द्यावी लागते. शकिलची एकूण मालमत्ता 1887 कोटी इतकी आहे. त्याला माजी पत्नीला देखभालीचे आणि चार मुलांना सांभाळण्यासाठी जवळपास साडेपंधरा लाख द्यावे लागतात.
2 / 10
ब्रिटीश गोल्फपटू निक फॅल्डो यानं 2006 मध्ये पत्नी वॅलेरी हिच्यासोबतचा 5 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला. त्याला हा घटस्फोट 71 कोटींचा पडला. निकची एकूण मालमत्ता 335 कोटी 64 लाख 89,774 इतकी आहे.
3 / 10
दिग्गज बॉक्सर माईक टायसन आणि रॉबीन गिव्हन्स यांचा संसार एक वर्षही टिकला नाही. पण, टायसनला घटस्फोटानंतर तिला 76 कोटी 75 लाख 88,912 द्यावे लागले.
4 / 10
WWE स्टार हल्क हॉगन ( खरं नाव टेरी बोलीआ) याने 1983मध्ये लिंडा क्लॅरीड हिच्याशी लग्न केलं. 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिला तरल मातमत्तेची 70 टक्के रक्कम द्यावी लागली आणि त्याशिवाय एकूण संपत्तीतील 40 टक्के रक्कम द्यावी लागली. हल्क हॉगनला पत्नीला 105 कोटी द्यावी लागली.
5 / 10
बेसबॉल दिग्गज अॅलेक्स रॉड्रीगेज यानं 2002मध्ये सिंथीया स्कर्टीसशी लग्न केलं. मियामिच्या एका जिममध्ये दोघांची ओळख झाली आणि त्यांना दोन मुलही आहेत. 2008मध्ये दोघांमध्ये भांडण झालं आणि घटस्फोटापर्यंत निर्णय गेला. घटस्फोटानंतर सिंथीयाला 134 कोटी द्यावे लागले.
6 / 10
दिग्गज सायकपटू लान्स आर्मस्ट्राँगची एकूण मालमत्ता 1006 कोटी आहे. त्यानं 1997मध्ये पत्रकार क्रिस्टीनशी विवाह केला. पण, 2003मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पोटगी म्हणून लान्सला पत्नीला 143 कोटी द्यावे लागले.
7 / 10
दिग्गज गोल्फपटू टायगर वूड्स आणि एलिन नॉर्डग्रेन यांच्यातील घटस्फोट हा क्रीडा विश्वातील सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये आघाडीवर आहे. वूड्सला पत्नीला तब्बल 766 कोटी द्यावे लागले.
8 / 10
गोल्फपटू ग्रेग नॉर्मन आणि लॉरा अँडरसी यांचा संसार 22 वर्ष टिकला. 2007मध्ये घटस्फोटानंतर त्याला पत्नीला 794 कोटी द्यावे लागले.
9 / 10
दिग्गज बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन आणि जौनिटा जॉर्डन यांनी 1989मध्ये लग्न केलं. 17वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. मायकल जॉर्डनला पोटगी म्हणून 1283 कोटी द्यावे लागले.
10 / 10
इंग्लिश प्रीमिअर लीगमधील चेल्सी फुटबॉल क्लबचा मालक रोमन अब्रामोव्हिच याचा घटस्फोट सर्वात महागडा आहे. त्याला पत्नी एरिनाला 9574 कोटी द्यावे लागले.
टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईFootballफुटबॉलboxingबॉक्सिंग