तो टीम इंडियाचा आधार, तर ती महिला संघाची शिलेदार, आता दोघे अडकणार विवाह बंधनात, तारीख ठरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:26 IST2025-03-15T18:18:48+5:302025-03-15T18:26:33+5:30
Mandeep singh Udita Kour Marriage: भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रमुख खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू उदिता कौर हे विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रमुख खेळाडू मनदीप सिंग आणि भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू उदिता कौर हे विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित झाली आहे.
गतवर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघामध्ये मनदीप सिंग याचा समावेश होता.
तर उदिता कौर हीसुद्धा भारताच्या महिला हॉकी संघाची सदस्य राहिली आहे. ती २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य, २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाची सदस्य होती. त्याशिवाय २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथं स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघाचीही ती सदस्य होती.
मनदीप सिंग आणि उदिता कौर यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिकासुद्धा समोर आली आहे.
दोघांच्याही घरी सध्या लगीनघाई सुरू असून, त्यांचा विवाह २१ मार्च रोजी पंजाबमधील जालंधर येथील मॉडल टाऊनस्थित श्री गुरद्वारा सिंग सभा येथे होणार आहे.
तर २२ मार्च रोजी रिसेप्शन पार्टी दिली जाणार असून, पार्टीला राजकीय नेतेमंडली आणि क्रीडापटू उपस्थित राहणार आहेत.