शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वडिलांची दिवसाला ८० रुपये कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे; संकटावर मात करणाऱ्या राणी रामपालनं भारताला दाखवलं ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 1:00 PM

1 / 12
भारतीय महिला हॉकी संघानं ( Indian women's hockey ) सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा प्रवेश त्यांनी साध्यासुध्या नाही तर तीन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून केला... ( Hockey: India women stun Australia 1-0 to make maiden Olympic semifinal).
2 / 12
महत्त्वाच्या परिक्षेत हुशार मुलांकडून फार अपेक्षा असतात, त्यामुळे ढ किंवा अॅव्हरेज मुलांकडे कोणाचं लक्षच नसतं... तसेच टोकियोत दाखल होण्यापूर्वी हा महिला संघ ढ किंवा अॅव्हरेज मुलांमध्येच होता आणि नेमबाद, तिरंदाज, बॉक्सर हुशार विद्यार्थ्यांमध्ये होते.
3 / 12
झालं उलटंच इथे ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्डे मारिन्ज आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे...
4 / 12
राणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी ही २०१७ पासून उंचावत गेली अन् त्याचे पहिले फळ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले. ३६ वर्षांनंतर भारतीय महिलांनी ऑलिम्पिकची पात्रता मिळवली अन् आज थेट उपांत्य फेरी गाठली.
5 / 12
मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती, घरात वीज नाही, झोपल्यानंतर कानाजवळ भुणभुण करणारे डास, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, पावसाळ्यात तर घराचे तलाव बनायचे... अशा परिस्थिती राणी रामपाल लहानाची मोठी झाली. कुटुंबीयांनी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जंगजंग पछाडले... वडिल कार्ट पुलर होते आणि आई घरकाम करायची...
6 / 12
तिच्या घरानजीकच हॉकी अकादमी होती आणि मी दिवसाचे बरेच तास तेथे सराव करणाऱ्या खेळाडूंना बघण्यात घालवायचे, असे राणी सांगते. ती म्हणाली,'' मलाही तेव्हा खेळावं असे वाटायचे, परंतु पप्पा दिवसाला ८० रुपये कमवायचे अन् त्यांना हॉकी स्टीक्स घेणे परवडणारे नव्हते. मला हॉकी शिकवा, अशी विनवणी मला प्रशिक्षकांकडे करावी लागायची, अक्षरशः मी त्यांच्याकडे त्यासाठी भीकही मागितली, परंतु त्यांनी मला नकार दिला. कारण, मी कुपोषित वाटत होते आणि तुझ्या तेवढी ताकद नाही असे त्यांनी मला सांगितले.''
7 / 12
एक दिवस तिला तुटलेली हॉकी स्टीक्स मिळाली आणि तिनं सरावाला सुरुवात केली. तिच्याकडे सरावासाठीचे कपडेही नव्हते, तेव्हा ती सलवार कमीज घालून मैदानावर पळायची, तिला स्वतःला सिद्ध करायचे होते. बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रशिक्षकांनीही तिला ट्रेनिंग देण्यास होकार दिला.
8 / 12
पण, हे सर्व जेव्हा घरी सांगितले, तेव्हा घरचे म्हणाले, ''लडकिंया घर का काम करती है. हम तुम्हे स्कर्ट पेहेन कर खेलने नही देंगे.'' पण, तिनं निर्धार केला अन् घरच्यांना सांगितले की, मी अयशस्वी ठरले, तर तुम्ही जे सांगाल ते करेन. ''
9 / 12
''पहाटे सरावाला सुरुवात व्हायची, परंतु आमच्या घरी घड्याळही नव्हते. आकाशाकडे बघून अंदाज बांधत मी सकाळी उठायचे. हॉकी अकादमीत प्रत्येक खेळाडूला अर्धा लिटर दूध आणणे कम्पलसरी होतं. माझ्या घरच्यांना फक्त २००ml दूध घेणेही परवडणारे होता आणि कोणाला न सांगता मी त्यात पाणी मिसळून न्यायचे. कारण मला खेळायचे होते,''असे राणी म्हणाली. तिचा हा निर्धार पाहून प्रशिक्षकांनीही तिच्यासाठी नवी हॉकी स्टीक्स व शूज खरेदी केले.
10 / 12
राणीनं हॉकी खेळून पहिली केलेली कमाई ही ५०० रुपये होती आणि तिनं ते वडिलांकडे दिले. त्यांनी याआधी एवढे रुपये कधीच पाहिले नव्हते. एक दिवस स्वतःचं घर बनवेल, असे वचन तिनं त्यांना दिले. राज्याच्या संघाकडून खेळताना अनेक स्पर्धा जिंकल्यानंतर वयाच्या १५व्या वर्षी राष्ट्रीय संघाकडून तिला बोलावणं आलं.
11 / 12
नातेवाईक तेव्हा तिला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारायचे. पण, माझ्या कुटुंबीयांनी तिला पाठिंबा दिला. त्यानंतर ती हॉकी संघाची कर्णधार बनली. २०१७मध्ये तिनं घराचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज ती ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण करण्यापासून एक विजय दूर आहे.
12 / 12
नातेवाईक तेव्हा तिला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारायचे. पण, माझ्या कुटुंबीयांनी तिला पाठिंबा दिला. त्यानंतर ती हॉकी संघाची कर्णधार बनली. २०१७मध्ये तिनं घराचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज ती ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण करण्यापासून एक विजय दूर आहे.
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Hockeyहॉकी