IPL 2022 Salaries: Rohit Sharma, लोकेश राहुल ६० दिवसांत जेवढा पगार घेणार तेवढा भारताच्या या पठ्ठ्याने ४ दिवसात घेतला, इतिहास रचला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:21 PM2022-03-16T12:21:04+5:302022-03-16T12:26:08+5:30

IPL 2022 Salaries: आयपीएल म्हटलं की खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो.. पण, ऑक्शनमध्ये लागणारी कोट्यवधींची रक्कम ही जवळपास ६० दिवस खेळल्यानंतर त्यांना मिळते. मात्र, भारतीय खेळाडूने चार दिवसांत एवढी रक्कम कमावली की ती पाहून भल्याभल्यांना चक्कर आली.

IPL 2022 Salaries: आयपीएल म्हटलं की खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो.. आता कुठे आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झालेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) आयपीएल २०२०च्या मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक १५.२५ कोटी कमावले.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मालाही ( Rohit Sharma) ऑक्शनमध्ये एवढा पगार एका पर्वासाठी आतापर्यंत दिला नव्हता. लखनौ सुपर जायंट्सने कर्णधार लोकेश राहुलला ( KL Rahul) १७ कोटींमध्ये करारबद्ध केले आणि आयपीएल २०२२मधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

पण, रक्कम या खेळाडूंना आयपीएलच्या एका पर्वातील १६-१७ सामने खेळल्यानंतर मिळणार आहे. मात्र, भारताच्या एका खेळाडूने एका दिवसांत एवढी मोठी रक्कम कमावली आणि या आयपीएल स्टार्सची मान शरमेनं खाली गेली.

भारताचा गोल्फपटू अनिर्बन लाहिरी ( Golfer Anirban Lahiri) याने भारतीय क्रीडा विश्वात विक्रम रचला. फ्लोरिडा येथे पार पडलेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या लाहिरीने १६.७ कोटींची बक्षिस रक्कम ४ दिवसांत कमावली.

आता याची तुलना जर आयपीएलमध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडू लोकेश राहुल ( १७ कोटी) व इशान किशन ( १५.२५ कोटी) यांच्याशी करायची झाल्यास ६० दिवस घाम गाळल्यानंतर क्रिकेटपटूंना हा पगार मिळणार आहे

अनिर्बन लाहिरी हा एका स्पर्धेत सर्वाधिक बक्षिस रक्कम कमावणारा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी भारताच्या एकाही खेळाडूला एवढी मोठी बक्षिस रक्कम कमावता आलेली नाही.

फ्लोरिडा येथील स्पर्धेत लाहिरीने २.१८ मिलियन डॉलरचा चेक हाती घेतला. ७ वर्षांपूर्वी लाहिरीने PGA Tour स्पर्धा जिंकली होती. अन् आजच्या या उपविजेतेपदाने त्याने कारकीर्दित कमावलेली सर्वाधिक रक्कम ठरली.

आयपीएल २०२२ त सर्वाधिक पगार घेणारे खेळाडू - लोकेश राहुल ( लखनौ सुपर जायंट्स) १७ कोटी, रिषभ पंत ( दिल्ली कॅपिटल्स) १६ कोटी, रोहित शर्मा ( मुंबई इंडियन्स) १६ कोटी), रवींद्र जडेजा ( चेन्नई सुपर किंग्स) १६ कोटी, इशान किशन ( मुंबई इंडियन्स) १५.२५ कोटी) .