Camila Giorgi Dress Controversy, French Open 2022: अरे देवा! महिला टेनिसपटूने असा ड्रेस घातला की अंपायरने सांगितलं, 'ड्रेस बदलून ये'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 09:50 PM2022-05-31T21:50:18+5:302022-05-31T21:57:07+5:30

कॅमिलाने घातलेला ड्रेस अंपायरने का बदलायला सांगितलं... वाचा कारण

Camila Giorgi Dress Controversy, French Open 2022: सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत जबरदस्त सामने खेळले जात आहेत. मात्र या दरम्यान अनेकदा वादही होत असतात.

असाच एक वाद सध्या गाजल्याचं दिसून येतंय. जेव्हा महिला टेनिस स्टार सामना खेळण्यासाठी पोहोचली. पण त्यावेळी असं काही घडलं की त्यावरून काही वेळ वाद निर्माण झाल्याचं दिसलं.

फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत इटालियन टेनिसपटू कॅमिला जिओर्गी मॅच खेळण्यासाठी पोहोचली तेव्हा अंपायरने तिला ड्रेस बदलण्यास सांगितलं. त्यामागे कारणही तसंच होतं.

फ्रेंच ओपन स्पर्धेत तिसरी फेरी सुरू झाली. या फेरीसाठी इटलीची टेनिसपटू कॅमिला जिओर्गी सामना खेळण्यासाठी टेनिस कोर्टवर आली. त्यावेळी हा प्रकार घडला.

कॅमिला मॅच खेळण्यासाठी टेनिस कोर्टवर पोहोचली तेव्हा सामनाधिकाऱ्यांनी तिला आपल्याकडे बोलावले. अंपायरने कॅमिलाने परिधान केलेल्या ड्रेसवर आक्षेप घेतला आणि 'तुम्हाला हा ड्रेस बदलावा लागेल', असं सांगितले.

कॅमिलाला सामनाधिकाऱ्यांनी सांगितलं की, तिने दुसरा कोणताही ड्रेस आणला नाही, त्यामुळे तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. कॅमिलाच्या ड्रेसवर असलेला स्पॉन्सरचा लोगो नियमापेक्षा मोठा आहे. त्यावरून हा वाद निर्माण झाला.

कॅमिलाने दुसरा कोणताही पर्यायी ड्रेस आणला नव्हता, त्यामुळे तिला तोच ड्रेस घालून खेळू देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, तिने हा सामना ४-६, ६-१, ६-० ने जिंकला.