Instagram, Russian Cheerleader Nude Photo: रशियन चीअरलीडरचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामने केले डिलीट; तरूणीचा झाला तिळपापड अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 06:04 PM2022-01-24T18:04:01+5:302022-01-24T18:19:09+5:30

तिने २०१९ मध्ये चॅलेंज दिल्यानुसार टॉपलेस सेशनही केलं होतं.

रशियाची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि चीअरलीडर उलियाना त्रायगबचॅक (Ulyana Trigubchak) सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट केले होते, ज्यामुळे इंस्टाग्रामचे नियम मोडले गेले.

इन्स्टाग्रामच्या नियमात न बसल्याने त्यांनी तिचे फोटोच डिलीट करून टाकले. यावरूनच सध्या मोठा वाद सुरू असून त्याचा तिने अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

उलियानाचे इंस्टाग्रामवर ६५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे इन्स्टाग्राम रील्स लाखो लोक पाहत असतात.

उलियानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोशूटचे फोटो शेअर केले. ते न्यूड फोटो असल्याने इन्स्टाग्रामच्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे इंस्टाग्रामनेच हे फोटो डिलीट केले.

उलियाना ही Salavat Yulaev हॉकी क्लबची चीअरलीडर आहे. ती सतत तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. मात्र, यावेळी फोटोशूटमध्ये शेअर केलेले बहुतांश फोटो हे टॉपलेस होते, त्यामुळे इन्स्टाग्रामने तिच्यावर ही कारवाई केली.

उलियानाने २०१९ मध्ये जाहीर केले होते की जर तिचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर ती टॉपलेस सेशन करेल. संघ जिंकल्यानंतर तिने खरंच टॉपलेस सेशन केलं.

उलियानाला याआधीही टॉपलेस फोटो शेअर केल्याने फटका बसला होता. टॉपलेस फोटो पोस्ट केल्याने तिचा फोटो आधीही हटवण्यात आला होता. तसेच, तिच्या टीमने तिची चीअरलीडर म्हणून मिळणारी सेवाही बंद केली होती.

उलियाना या वेळी पुन्हा आपले न्यूड फोटो पोस्ट केले. त्यामुळे इन्स्टाग्रामने तिचे फोटो डिलीट करून टाकले.

उलियानाला मात्र ही कारवाई पटली नाही. त्यामुळे तिने याचा विरोध करत नियम चुकीचे असल्याचं म्हटलं. तसंच निषेध म्हणून तिने हिजाब घातलेला फोटोही पोस्ट केला. (सर्व फोटो सौजन्य - ट्वीटर / इन्स्टाग्राम)