Paige Spiranac: टायगर वुड्ससाठी हॉट गोल्फरने उतरवले कपडे, पाहा कोण आहे ही सुंदर ललना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:53 PM2022-04-08T14:53:12+5:302022-04-08T15:05:16+5:30

Paige Spiranac: पेग स्पिरनाक (Paige Spiranac) हिला इंस्टा गोल्फ गर्ल या नावाने ओळखले जाते. इंस्टाग्रामवर तिचे ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, पेग स्पिरानाक हिने तिच्या चाहत्यांना एक प्रॉमिस केले होते. जर टायगर वुड्स हा अगस्टा मास्टर्स स्पर्धेत खेळला तर ती तिच्या अंगावरचं टॉवेल उतरवेल, असे तिने म्हटले होते.

पेग स्पिरनाक (Paige Spiranac) हिला इंस्टा गोल्फ गर्ल या नावाने ओळखले जाते. इंस्टाग्रामवर तिचे ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, पेग स्पिरानाक हिने तिच्या चाहत्यांना एक प्रॉमिस केले होते. जर टायगर वुड्स हा अगस्टा मास्टर्स स्पर्धेत खेळला तर ती तिच्या अंगावरचं टॉवेल उतरवेल, असे तिने म्हटले होते.

अमेरिकन गोल्फर असलेली पेग स्पिरनाक ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते. तसेच ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आलेली आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच गोल्फ खेळतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.

पेग स्पिरनाक हिला इंस्टा गोल्फ गर्ल या नावाने ओळकले जाते. तसेच इन्स्टाग्रामवर तिचे ३० लाखांहून अधिक फॅन फॉलोअर्स आहेत. २९ वर्षांची पेग ही तिच्या फॅन्ससह आपले हॉट फोटो शेअर करत असते. हल्लीच तिचं एक विधान चर्चेत आले होते. ती तिच्या शरीरासोबत काय करते, त्यामुळे कुणाला काही वाटण्याची गरज नाही, असे तिने म्हटले होते.

पेग स्पिरनाक हिने २०१६ मध्ये प्रोफेशनल गोल्फला अलविदा केला होता. तिला गोल्फबरोबरच बास्केटबॉल आणि बॅडमिंटन खेळायला आवडते. इंस्टाग्रामवरील फोटोंमधून ते दिसून येते.

पेग प्सिरनाक ही दिग्गज गोल्फपटू टायगड वुड्सची खूप मोठी फॅन आहे. जर टायगर वुड्स अगस्ता मास्टर्स स्पर्धेत खेळला तर आपलं टॉवेल उतरवेन, असं प्रॉमिस पेग स्पिरनाकने केलं होतं.

रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या टायगर वुड्सने दीड वर्षांनंतर हल्लीच ऑगस्टा मास्टर्स स्पर्धेत खेळण्याची घोषणा केली. तेव्हा आनंदित झालेल्या पेगने कुठलाही वेळ न घालवता आपला एक फोटो इंस्टाग्रावर शेअर केला होता. त्यामध्ये तिने कुठलेही कपडे घातलेले नव्हते. या फोटोंमध्ये तिने तिचं शरीर केवळ फुलांनी झाकलं होतं. हा फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.