FIFA World Cup 2022: विजयाच्या आनंदात खेळाडूने तोडले नियम; शर्ट काढला अन् गर्लफ्रेंडला मैदानातच केला किस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:33 PM2022-11-22T19:33:00+5:302022-11-22T19:39:05+5:30

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी झालेल्या सामन्यात इंग्लिश संघाने इराणचा 6-2 ने मोठा विजय मिळवला. या विजयाचा हिरो बुकायो साका राहिला, त्याने दोन महत्त्वपूर्ण गोल केले. इंग्लंडने या विजयासह 3 गुण प्राप्त केले आहेत.

हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघासाठी ज्युड बेलिंगहॅमने 35व्या मिनिटाला पहिला गोल केला होता. हा सामन्याचा पहिलाच गोल होता. तर जॅक ग्रीलिशने 90व्या मिनिटाला इंग्लंड संघासाठी शेवटचा गोल केला.

या विजयासह आणि गोल केल्यानंतर जॅक ग्रीलिशने वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. जे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहे. त्याने मैदानावरच आपला टी-शर्ट काढला आणि प्रेक्षकांसमोरच आपल्या गर्लफ्रेंडला किस केला. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर कतार हा 30 लाख लोकसंख्येचा देश आहे. मात्र या देशात महिलांविषयीचे कायदे कडक असून तिथे शिक्षाही जबरदस्त असते.

यामुळे फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनाच नाही तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रेक्षकांनाही पत्नी, गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करता येणार नाही असा नियम आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेवर खूपच निर्बंध आहेत. इथे हॉटेल आणि जागेचीही समस्या आहे. या साऱ्या नियमांचे इंग्लंडच्या खेळाडूंनी उल्लंघन केले असल्याचे बोलले जात आहे.

कतारमध्ये फिफा विश्वचषकादरम्यान कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महिला चाहत्यांना संपूर्ण अंगभर कपडे घालण्यास सांगितले आहे. पुरुष देखील अशी जीन्स घालू शकत नाहीत, जी गुडघा झाकू शकत नाही. खेळाडूंना टी-शर्ट काढण्यास देखील मनाई आहे.

इंग्लंडसाठी बुकायो साकाने 43व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. बचावपटू हॅरी मॅग्वायरनेही शानदार पास देऊन बुकायो साकाच्या गोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कर्णधार हॅरी केनच्या पासवर रहीम स्टर्लिंगने (45+1व्या मिनिटाला) इंग्लंडसाठी तिसरा गोल केला. दुसऱ्या हाफमध्येही इंग्लंडने तीन गोल केले. हे गोल बुकायो साका (62वा मिनिट), मार्कस रॅशफोर्ड (71वा मिनिट) आणि जॅक ग्रीलिश (89 व्या मिनिटाला) यांनी केले.

दुसरीकडे, मेहदी तारेमीने इराणसाठी 65व्या मिनिटाला आणि 90+13व्या मिनिटाला दोन्ही गोल केले. सामन्यातील शेवटचा गोल मेहदी तारेमीने पेनल्टीद्वारे केला, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. इंग्लंडने हा सामना 6-2 अशा फरकाने जिंकला.