तुम्हाला माहितीये का? टेनिस कोर्टवरील या सुंदरीला 'द टायगर' नावानं ओळखलं जातं; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:53 IST2025-09-05T17:15:20+5:302025-09-05T17:53:54+5:30

जाणून घेऊयात टेनिस जगतातील नंबर वन महिला टेनिसपटूसंदर्भातील काही खास गोष्टी

टेनिस जगतातील नंबर महिला टेनिसपटू आर्यना संबालेंका ही कोर्टवरील आपल्या सर्वोत्तम कामगिरीशिवाय सौंदर्यामुळं चर्चेत राहणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे.

बेलारुसची नंबर वन महिला टेनिसपटूनं अमेरिकन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीत आपल्या कामगिरीतील सातत्य दाखवून देत फायनल गाठली आहे. वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी ती अमेरिकेच्या अमांडा अनीसिमोवाविरुद्ध भिडताना दिसेल.

२७ वर्षीय आर्यना सबालेंका हिने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकिर्दीत २ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत अमांडाकडून सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यालर तिने काही काळ ब्रेक घेतला होता. आता या पराभवाची परतफेड करण्यासाठी ती कोर्टवर उतरेल.

आर्यना सबालेंकाचा जन्म १९९८ मध्ये बेलारूस येथील मिंस्क येथे झाला, तिचे वडील एक आइस हॉकी प्लेयर होते. २०१३ मध्ये या सुंदरीनं टेनिस कोर्टवरील आपल्या प्रवासाची सुरुवात केली.

बेलारूसची टेनिस कोर्टवरील सुंदरी भटकंतीची शौकीन आहे. खेळातील कामगिरीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हॉट अँण्ड ब्यूटीफूल चाहत्यांना घायाळ करत असते.

सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर तिने ३४ लाख फॉलोअर्स कमावले आहेत. तिच्या प्रत्येक फोटो अन् व्हिडिओवर चाहते प्रेमाची 'बरसात' करत असतात.

वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी या नंबर वनट महिला टेनिसपटून खेळातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर बक्षीस स्वरुपात मिळालेली रक्कम आणि जाहिरातीच्या माध्यमातून जवळपास १४० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

आर्यना संबालेंकाच्या डाव्या हातावर वाघाचा टॅटू आहे. यामुळे तिला "द टायगर" हे टोपणनाव मिळाले असून ति स्वतःलाही या नावाने संबोधले आहे.

सेरेना विलियम्स आणि मारिया शारापोव्हा यांना आदर्श मानणाऱ्या टेनिस स्टारमध्ये खेळात सेरेनासारखा धाक तर लूक्समध्ये शारापोव्हाची बात दिसून येते.

टॅग्स :टेनिसTennis