Tokyo Olympics: मॉडल नाही प्रसिद्ध खेळाडू आहे Alica Schmidt, ट्रॅकवर धावते तेव्हा बघतच राहतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:43 PM2021-07-24T16:43:33+5:302021-07-24T17:33:48+5:30

जर्मनीची खेळाडू (German Athlete ) अलिसा (Alica Schmidt) जगातल्या सर्वात सुंदर आणि सेक्सिएस्ट खेळाडूंपैकी एक आहे.

मोठ्या प्रतिक्षेनंतर जपानच्या (Japan) टोकीयोमध्ये (Tokyo Olympic) ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाली. खेळाच्या सर्वात मोठ्या महाकुंभात प्रत्येक देशाचे खेळाडू मेडल जिंकण्यासोबतच आपल्या देशाचं नाव मोठं करण्याच्या उद्देशाने स्पर्धेत येतात. पण काही असेही खेळाडू असतात जे त्यांच्या कौशल्यासोबतच आपल्या फॅन फॉलोइंग आणि सुंदरतेच्या भरोशावर सोशल मीडियावर राज्य करतात. अशाच खेळाडूंपैकी एक आहे जर्मनीची अलिसा स्मिट (Alica Schmidt). अलिसाला सर्वात सुंदर खेळाडू मानलं जातं.

जर्मनीची खेळाडू (German Athlete ) अलिसा (Alica Schmidt) जगातल्या सर्वात सुंदर आणि सेक्सिएस्ट खेळाडूंपैकी एक आहे. ती तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलिसाने जगातली सर्वात सेक्सी खेळाडू (Sexiest athlete in the world)चं टायटल आपल्या नावावर केलं आहे.

'द सन' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, Tokyo Olympic सुरू होण्याआधी अलिसा म्हणाली होती की, तिला सेक्सिएस्ट खेळाडूचा टॅग अजिबात पसंत नाही. ती इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव असून लाखो लोक तिला फॉलो करतात.

अलिसा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. याच कारणाने अलिसाला जर्मनीतील प्रसिद्ध फुटबॉल क्लब Borussia Dortmund (BVB) कडून फिटनेस कोच म्हणून हायर केलं आहे.

८ नोव्हेंबर १९९८ ला जन्मलेली जर्मनीची रनर अलिस स्मिट आता २२ वर्षांची आहे. तिला जर्मनीची फ्यूचर स्टार मानलं जातं.

अलिसाने तिच्या करिअरची सुरूवात ज्यूनिअर लेव्हलपासून केली होती. अलिसाने २०१७ मध्ये अंडर-२० यूरोपिया एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 4x400 रिले आणि ४०० मीटर इवेंटमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलं होतं.