शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हा तरुण आहे मायावतींचा राजकीय वारसदार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:05 PM

1 / 5
बसपाप्रमुख मायावती यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सपा आणि रालोद या पक्षांसोबत महाआघाडी करत उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, प्रचारसभेत आक्षेपार्ह वक्तव्य वापरल्याने मायावतींविरोधात निवडणूक आयोगाने ४८ तास प्रचारबंदीची कारवाई केली होती. या काळात एका तरुणाने बसपाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. हा तरुणच मायावतींचा वारसदार असल्याचे सांगण्यात येत आहे जाणून घ्या या तरुणाविषयी
2 / 5
प्रत्येक ठिकाणी मायावतींच्या सोबत दिसणाऱ्या या तरुणाचं नाव आहे आकाश आनंद. ते मायावतींचे भाचे आहेत. तसेच ते मायावतींचे राजकीय वारसदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
3 / 5
आकाश आनंद हे सध्या प्रत्येक राजकीय दौऱ्यात मायावतींसोबत राहून राजकीय धडे घेत आहेत. तसेच मायावतींवर बंदी आल्यानंतर आकाश आनंद यांनी आग्रा येथील सभेत भाषणही केले होते.
4 / 5
मायावतींचे बंधू आनंद यांचे आकाश हे पुत्र असून, त्यांनी लंडनहून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ते मायदेशात परतल्यानंतर त्यांना राजकारणात आणणार असल्याची घोषणा मायावतींनी केली होती.
5 / 5
आकाश यांना पक्षात युवानेता म्हणून पुढे आणण्याची मायावतींची इच्छा आहे. मात्र त्यांच्याकडे अद्याप कुठलेही पद देण्यात आलेले नाही.
टॅग्स :mayawatiमायावतीPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक