शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डिप्रेशनची शिकार झाली होती येडियुरप्यांची नात डॉ. सौंदर्या, छोट्या मुलाच्या प्रेमानेही बदलला नाही निर्णय, घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:38 PM

1 / 7
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या व्ही.आय. यांनी केलेल्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या सौंदर्या यांनी शुक्रवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
2 / 7
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सौंदर्या यांनी त्यांच्या मुलाला दुसऱ्या खोलीत सोडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौंदर्या ह्या डिप्रेशनच्या शिकार होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
3 / 7
सौंदर्या ह्या एका खासगी रुग्णालयात डॉक्टर होत्या. त्यांचा विवाह हा त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर नीरज एस. यांच्याशी झाला होता. नीरज शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये गेले. तर सौंदर्या आणि त्यांचं लहान बाळ घरी होते. त्याचवेळी घरात काम करणाऱ्या कामवालीने नीरज यांना फोन करून मॅडम दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले.
4 / 7
कामवालीचे बोलणे ऐकून धक्का बसलेल्या नीरज यांनी कामावरून सौंदर्या यांना फोन केला. मात्र काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा ते तातडीने घरी आले.
5 / 7
नीरज यांनी घरी आल्यावर सौंदर्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर दरवाजा तोडला असता सौंदर्या ह्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
6 / 7
पोलिसांनी फ्लॅटवर जाऊन सौंदर्यांचा मृतदेह खाली उतरवला. तसेच पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता काहीही संशयास्पद आढळून आले नाही.
7 / 7
या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह काही मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी येडियुरप्पा यांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन केले. सौंदर्या यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी डॉ. नीरज यांच्याशी झाले होते. सौंदर्या यांना चार महिन्यांचे एक बाळ आहे.
टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारKarnatakकर्नाटक