देशाची शान आहेत 'ही' सात ऐतिहासिक ठिकाणं, जगभरात मिळाली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 03:20 PM2018-04-18T15:20:35+5:302018-04-18T15:20:35+5:30

18 एप्रिल रोजी दुनियाभरात वर्ल्ड हेरिटेज डे साजरा केला जातो आहे. यानिमित्ताने आपण जाणून घेऊया भारतातील अशा काही वास्तू ज्यांना युनेस्कोने जागतिक वारसा सूचीत टाकलं आहे. ताजमहाल- आगरा शहरात असणारं ताजमहल मुघल सम्राट शाहजहाँनने पत्नी मुमताजसाठी बनवलं होतं. मुघल वास्तूकलेंच ताजमहल उत्तम उदाहरण आहे.

आगरा किल्ला- 1983मध्ये युनेस्कोने आगरा किल्ल्याला जागतिक वारसा सूचीत टाकलं. हा भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला आहे. भारतातील मुघल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहाँ, औरंगजेब याच किल्ल्यात राहायचे.

अजिंठा गुफा- 1983मध्ये युनेस्कोने अजिंठा गुफांना जागतिक वारसा घोषित केलं. महाराष्ट्रात असणाऱ्या या लेणीमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित चित्रणं व शिल्पकारीते उत्कृष्ट नमूने पाहायला मिळतील.

कोणार्कमधील सूर्य मंदिर- उडीसातील पुरीमध्ये आहे. हे मंदिर लाल रंगाचा खडक व काळ्या ग्रेनाइड दगडाने इ.स.पू 1236-1264मध्ये राजा नृसिंहदेवने तयार केलं आहे.

काजीरंगा राष्ट्रीय उद्यान- मध्या आसाममध्ये 430 वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रफळात पसरलं आहे. एकशिंगी गेंड्यांसाठी हे उद्यान प्रसिद्ध असून 1905मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान घोषित केलं होतं.

गोव्यातील चर्च- 1986मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत या चर्चची नोंद केली.

फतेहपुर सिक्री- आगऱ्यातील एक नगरपालिकेचा बोर्ड आहे. उत्तर प्रदेशात असणारं फतेहपुर सिक्रीची स्थापना 1569 साली झाली.