By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:00 IST
1 / 9 सोशल मीडियावर वडापाव गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेल्या चंद्रिका दीक्षित हिच्या वैवाहित जीवनात वादळ आलं आहे. पती युगम गेरा याच्यासोबतच्या तिच्या नात्यामध्ये सध्या तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोघेही एकमेकांवर फसवणुकीचे आरोप करत आहेत. तसेच त्यांच्यातील भांडण घरातून चव्हाट्यावर आलं आहे. याचदरम्यान, चंद्रिका हिचे एका मिस्ट्री मॅनसोबतचे रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 2 / 9चंद्रिका ही या मिस्ट्री मॅनसोबत नियमितपणे रोमँटिक रील्स बनवताना दिसत आहे. कधी हा मिस्ट्री मॅन पती बनून तिच्या भांगामध्ये कुंकू लावतो, तर कधी तिला मिठीत घेताना दिसतो. या दोघांनीही एक फेक वेडिंग शूटसुद्धा केलं होतं. त्यामुळे हा मिस्ट्री मॅन कोण असा सवाल फॅन्स विचारत आहेत. 3 / 9याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार चंद्रिका हिचा मिस्ट्री मॅन हा अलीगड येथील रहिवासी आहे. आपलं दिल्लीत शिक्षण झालं असून, आपण पेशाने कंटेंट क्रिएटर आहोत, असे तो सांगतो. आपण गायक आहोत अशीही माहिती त्याने दिली आहे. तसेच त्याच्याकडे मॅक्स रुग्णालयात काम करण्याचा अनुभवही आहे. 4 / 9सध्या मला एकता कपूरच्या मालिकांपेक्षा अधिक टीआरपी मिळत आहे. माझ्या आणि चंद्रिकाच्या कंटेंटला बऱ्यापैकी प्रेक्षक वर्ग मिळत आहे. 5 / 9या मिस्ट्री मॅनने चंद्रिका हिचा पती युगम गेरा याच्यावरही टीका केली आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने सांगितले की, युगम रॅपिडो चालवत होता, सध्या चालवत आहे आणि यापुढेही चालवत राहील. सध्या त्याची जी परिस्थिती आहे ते पाहता तो पुन्हा रॅपिडोवर येईल. 6 / 9या मिस्ट्री मॅनने पुढे सांगितले की, चंद्रिकाचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा होता. चंद्रिका आणि युगम यांनी एकत्र राहावं, असं मला वाटायचं, असेही तो म्हणाला. तसेच चंद्रिकासोबत रोमँटिक नातं असल्याचं वृत्तही या मिस्ट्री मॅनने फेटाळून लावलं आहे. तसेच फॅन्सनी हे नातं जोडल्याचा दावाही त्याने केला आहे. 7 / 9यावेळी चंद्रिकासोबत झालेल्या पहिल्या भेटीबाबत या मिस्ट्री मॅनने सांगितले की, मी तिच्या दुकानामध्ये वडा पाव खाण्यासाठी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा भेटलो. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी चंद्रिका हिने वडापावचा स्टॉल उघडला होता. 8 / 9मिस्ट्री मॅन पुढे म्हणाला की, मी वाईट काळात चंद्रिका हिला पाठिंबा देऊ इच्छितो. तिला साथ देऊ इच्छितो. तसेच चंद्रिका हिच्यासोबत वडापावचा शॉप उघडण्याचा माझा कुठलाही इरादा नाही आहे. 9 / 9यावेळी या मिस्ट्री मॅनने चंद्रिका आणि तिच्या पतीलाही सल्ला दिला. त्याने सांगितले की, चंद्रिका आणि तिच्या पतीने एकत्र बसून बोललं पाहिजे आणि त्यांच्या नात्यामधील मतभेद मिटवले पाहिजेत. मात्र युगम हा जाणीवपूर्वक हा वाद मिटवत नाही आहे, असा आरोपही त्याने केला.