By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 20:09 IST
1 / 9ओडिशातील राज्यसभेच्या ४ जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या मतदानात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाचा आदेश धाब्यावर बसवत क्रॉस वोटिंग केले. यामध्ये रमेश जेना, दशरथी गोमांगो आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोफिया फिरदौस यांचा समावेश आहे.2 / 9सोफिया फिरदौस यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करून स्वपक्षीय नेतृत्वाच्या निर्णयाला उघडपणे आव्हान दिले आहे. काँग्रेसने बीजू जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर सोफिया यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. 3 / 9सोफिया यांच्या मते, उमेदवाराला पाठिंबा देताना काँग्रेसने आपल्याच आमदारांशी कोणतीही चर्चा केली नाही. ज्यामुळे ओडिशात काँग्रेसची आज ही दयनीय अवस्था झाली आहे, त्याच पक्षाला आपण पाठिंबा का द्यावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.4 / 9सोफिया यांनी आरोप केला की, बीजू जनता दल ही भाजपची 'बी-टीम' असून त्यांनी संसदेत वक्फ बिल असो वा इतर विषय, नेहमीच भाजपला साथ दिली आहे. अशा स्थितीत काँग्रेसने त्यांच्यासोबत जाणे चुकीचे आहे.5 / 9सोफिया फिरदौस यांची राजकीय आणि वैयक्तिक पार्श्वभूमी अत्यंत प्रभावी आहे. सोफिया यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बाराबती-कटक मतदारसंघातून विजय मिळवला. त्या ओडिया मुस्लिम समुदायातील पहिल्या महिला आमदार आहेत.6 / 9सोफिया यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech केले असून IIM बेंगळुरू येथून मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजिका होत्या.7 / 9सोफियाने विविध व्यावसायिक आणि औद्योगिक संस्थांमध्येही महत्त्वाची पदे भूषवली आहेत. २०२३ ते २०२५ या कालावधीत त्यांनी क्रेडाईच्या भुवनेश्वर शाखेची अध्यक्षा म्हणून काम पाहिले. यासह, या संस्थेच्या इतिहासात एखाद्या शहराची किंवा राज्याची शाखा नेतृत्व करणारी ती पहिलीच महिला ठरली.8 / 9त्या माजी आमदार मोहम्मद मोकीम यांच्या कन्या आहेत. वडिलांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आल्यानंतर काँग्रेसने सोफिया यांना संधी दिली होती.9 / 9सोफिया फिरदौस यांनी २०२४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि बाराबती-कटक मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ओडिशा विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी भाजपचे पूर्णचंद्र महापात्र यांचा ८,००१ मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. सोफिया यांनी ५.२४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली. २०१५ मध्ये त्यांनी ओडिशातील व्यावसायिक शेख मेरासुल हक यांच्याशी विवाह केला.