Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:59 IST
1 / 11पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी 'राईट टू रिप्लाय' वापरून दहशतवादावरुन पाकिस्तानला चांगलंच घेरलं. 2 / 11पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. 'पाकिस्तानचे पंतप्रधान ज्या 'विजयाबद्दल' बोलत आहेत ते प्रत्यक्षात भारताने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले एअरबेस, जळालेले हँगर आणि तुटलेल्या रनवेचे सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले फोटो आहेत.' 3 / 11'जर पाकिस्तानला हा विजय वाटत असेल तर तो त्यांना वाटू द्या' असं म्हणत गहलोत यांनी सडेतोड उत्तर दिलं. त्यांचं हे भाषण फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरच गाजलं नाही तर भारतातही सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. प्रत्येकालाच भारताच्या या लेकीबद्दल जाणून घ्यायचं आहे. 4 / 11पेटल गहलोत या भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) अधिकारी आहेत. त्या सध्या संयुक्त राष्ट्र (UN) मधील भारतीय मिशनमध्ये प्रथम सचिव (First Secretary) म्हणून कार्यरत आहेत. 5 / 11दिल्लीत जन्मलेल्या पेटल यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतलं, जिथे राज्यशास्त्रात (Political Science) पदवी मिळवली.6 / 11त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला, जिथे तिने राज्यशास्त्रात एमए केलं. २०१५ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) रुजू झाल्या.7 / 11सध्या न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय मिशनच्या प्रथम सचिव आहेत. पेटल यांनी यापूर्वी भारतीय परराष्ट्र सेवेच्या युरोप वेस्ट डिव्हिजनमध्ये अंडर सेक्रेटरी म्हणून काम केलं आहे.8 / 11पॅरिसमधील भारतीय मिशनमध्ये तसेच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात विविध पदांवर काम केलं आहे.9 / 11पेटलची यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांना कलेची विशेष आवड आहे. गिटार वाजवण्याचा आणि गाण्याचा छंद आहे. जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्या आपला छंद जोपासतात. 10 / 11पेटल गहलोत यांनी गायलेलं इटालियन गाणं 'बेला चाओ' सोशल मीडियावर खूप जास्त लोकप्रिय झालं होतं. त्या आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 11 / 11पेटल गहलोत यांनी गायलेलं इटालियन गाणं 'बेला चाओ' सोशल मीडियावर खूप जास्त लोकप्रिय झालं होतं. त्या आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.