ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 11:49 IST2025-05-18T11:36:28+5:302025-05-18T11:49:14+5:30
Pakistani Spy Jyoti Malhotra News: कोरोनाच्या आधीपर्यंत अवघ्या २० हजारांच्या पगारासाठी नोकरी करणारी ही ज्योती मल्होत्रा एकाएकी अशी कशी फेमस झाली, पाकिस्तानसाठी कशी काय काम करू लागली असा सवाल प्रत्येक भारतीयाच्या मनात घोळू लागला आहे. या देशद्रोही ज्योतीबाबत धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.

हरियाणाच्या तरुणीने देशात खळबळ उडवून दिली आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या आधीपर्यंत अवघ्या २० हजारांच्या पगारासाठी नोकरी करणारी ही ज्योती मल्होत्रा एकाएकी अशी कशी फेमस झाली, पाकिस्तानसाठी कशी काय काम करू लागली असा सवाल प्रत्येक भारतीयाच्या मनात घोळू लागला आहे. या देशद्रोही ज्योतीबाबत धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.
ज्योतीची घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे, परंतू ती मात्र लक्झरी लाईफ जगत होती. हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीत तिचे घर आहे. वडील कारपेंटर आहेत. परंतू, त्यांचे एवढे उत्पन्न नसल्याने काकांच्याच पेन्शनवर घर चालते. मग ही तरुणी एवढे लक्झरी लाईफ कसे काय जगत होती, असा सवाल भारतीयांना पडणे सहाजिकच आहे.
दिल्लीत ही ज्योती २०००० रुपयांच्या पगारावर नोकरी करत होती. कोरोनात तिची नोकरी गेली आणि ती गावी आली. तिथून तिने युट्यूबवर ट्रॅव्हल व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली. तिचा चॅनल लोकप्रिय बनला आणि मग तिला पंख फुटू लागले. ती काही वर्षांतच लक्झरी लाईफ जगू लागली. यानंतर मात्र ज्योतीने शेजारी पाजाऱ्यांशी बोलणे सोडले.
तिच्या ट्रॅव्हल युट्यूब चॅनलमुळे तिला पाकिस्तानचा व्हिसा मिळाला होता, कारण तिने पर्यटनाचे कारण दिले होते. यावेळी तिची ओळख दानिश नावाच्या पाकिस्तानी दुतावासाच्या अधिकाऱ्याशी झाली आणि मग तिचा पुढील देशविरोधी प्रवास सुरु झाला.
भारतात सामान्य आयुष्य जगणारी तरुणी पाकिस्तानात गेली की तिचे थाट काही औरच असायचे. एकदम व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट तिला दिली जायची असे काहीतरी ती करायची. पाकिस्तानात कुठेही फिरायचे असेल तिच्यासोबत पोलिसांची सुरक्षा होती. एकप्रकारे पाकिस्तान कसा चांगला आहे, हे दाखविण्याचे तिचे प्रयत्न असायचे.
ज्योती नेमके करायची तरी काय...
ज्योतीने पोलीस चौकशीत दोनदा पाकिस्तानात जाऊन आल्याचे सांगितले आहे. तसेच काश्मीरलाही ती जाऊन आली आहे. भारत-पाकिस्तान संबंध आणि काश्मीर मुद्द्याबाबत अवघ्या जगाला माहिती आहे, मग तरीही ती पाकिस्तासोबत मिळून या गोष्टी करत होती. म्हणजे पाकिस्तानसोबत मिळून तिची भारताविरोधात कारस्थाने सुरु होती.
एवढेच नाही तर ज्योती ही आयएसआय अधिकाऱ्यासोबत बालीला देखील गेली होती, नेपाळलाही ती फिरून आली होती. पाकिस्तानमध्ये हायप्रोफाईल पार्ट्यांना हजेरी, भारतात पाकिस्तानी एम्बसीच्या पार्ट्यांना हजेरी लावायची. त्याचा एक व्हिडीओ तिने नुकताच २३ मार्चला तिच्या चॅनलवर टाकला होता. त्यात ती चिनी अधिकाऱ्यांना व्हिसा द्या, असे सांगताना दिसत आहे. यात तिची इंग्रजीही मोडकी तोडकीच असल्याचेही समजते आहे.