कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने मुस्लिम प्रियकरासोबत केलं लग्न, प्रेमासाठी झुगारला वडिलांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 22:10 IST2026-03-11T22:07:24+5:302026-03-11T22:10:41+5:30

Makumbh Viral girl Monalisa: गतवर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यावेळी रुद्राक्षांच्या माळा विकणारी निळ्या-घाऱ्या डोळ्यांची मोनालिसा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, या मोनालिसाने आता तिचा प्रियकर असलेल्या फरमान याच्यासोबत पोलिसांच्या सुरक्षेत लग्न केलं आहे.

गतवर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यावेळी रुद्राक्षांच्या माळा विकणारी निळ्या-घाऱ्या डोळ्यांची मोनालिसा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, या मोनालिसाने आता तिचा प्रियकर असलेल्या फरमान याच्यासोबत पोलिसांच्या सुरक्षेत लग्न केलं आहे.

मध्य प्रदेशमधील खरगोन येथील असलेल्या मोनालिसाने तिचा महाराष्ट्रातील प्रियकर असलेल्या फरमानसोबत केरळमध्ये जात लग्न केलं आहे. तसेच तिने तिरुवनंतपुरम येथील तम्पानूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्याला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मोनालिसा आणि फरमान हे गेल्या दीड वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच फेसबूकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती.

दरम्यान, मोनालिसाच्या या प्रेमप्रकरणाला तिच्या कुटुंबीयांकडून तीव्र विरोध होत आहे. मोनालिसाचे वडील जयसिंह भोसले हे या नात्याला विरोध करत आहेत. तसेच कुटुंबीयांकडून आपल्यावर दबाव आणला जात होता. तसेच आपल्याला धमक्याही दिल्या जात होत्या, त्यामुळे मला घर सोडावं लागलं, असा आरोप मोनालिसा हिने केला आहे.

मध्य प्रदेशमधील मोनालिसा आणि महाराष्ट्रातील फरमान यांना एवढ्या दूर केरळमध्ये का आला आहात, असे पोलिसांनी चौकशी वेळी विचारले तेव्हा त्यांनी केरळमध्ये सामाजिक आणि धार्मिक दबावापासून आम्ही सुरक्षित राहू शकू, असे आम्हाला वाटले, म्हणून आम्ही इथे आलो, असे या दोघांनीही सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी मोनालिसा हिच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यामधून ती सज्ञान असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. तसेच कायदेशीररीत्या सज्ञान असल्याने मोनालिसा हिला फरमान सोबत जाण्याची परवानगी दिली.

दरम्यान, गतवर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यावेळी कुटुंबीयांसोबत मिळून रुद्राक्षांच्या माळा विकत असताना मोनालिसा ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसेच तेव्हापासून तिचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं होतं.