अमेरिकन लष्कराचे विमान G550, ११ तासांचा गुप्त हॉल्ट; तहव्वूरला भारतात आणण्याची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:44 IST2025-04-11T13:10:12+5:302025-04-11T13:44:06+5:30

तहव्वूर राणाला भारतात आणत असताना अमेरिकन विमानाने ११ तासांचा सिक्रेट हॉल्ट घेतला होता.

दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे, त्याला १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे.

राणा याला अमेरिकेपासून भारतात आणण्यापर्यंतचा प्रवास रंजक आहे. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला बराच वेळ लागलाच, पण त्याला भारतात आणताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली. राणाला अमेरिकन सैन्याच्या G550 विमानाने भारतात आणण्यात आले आहे.

राणाला भारतात आणताना ११ तासांचा सिक्रेट हॉल्ट घेण्यात होता. प्रत्यक्षात विमान रोमानियामध्ये ११ तासांसाठी थांबवण्यात आले होते.

हे विमान अचानक ११ तासांसाठी का थांबवण्यात आले याबाबत माहिती समोर आलेली नाही. काही तांत्रिक बिघाड होता की आणखी काही याबद्दल अजूनही माहिती समोर आलेली नाही.

ज्या विमानाने राणाला भारतात आणण्यात आले आहे ते एक व्यावसायिक जेट आहे. ते विमान व्हीव्हीआयपी लोक वापरतात. भारताने ऑस्ट्रियाकडून हे विमान भाड्याने घेतले होते.

९ एप्रिल रोजी पहाटे २.१५ वाजता मियामी सिटीहून विमानाने उड्डाण केले. तेथून विमान थेट रोमानियाची राजधानी बुखारेस्टला पोहोचले आणि तिथे ११ तास थांबा होता.

भारतीय वेळेनुसार, विमान रात्री ९.३० वाजता रोमानियाला पोहोचले. तिथून विमानाने भारतासाठी उड्डाण केले आणि पालम विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

हे गल्फस्ट्रीम G550 विमान अमेरिकन सैन्य ते C-37B आणि EA-37B कंपास कॉल म्हणून वापरत आहे. हे लांब पल्ल्यासाठी वापरले जाते. यात अनेक सुरक्षा फिचरचा समावेश आहे.