तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर, मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 11:06 PM2017-12-28T23:06:52+5:302017-12-28T23:13:01+5:30

नवी दिल्ली : तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर मुस्लिम महिलांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडले.

या तिहेरी तलाक विधेयकात काही दुरुस्त्या सुवचण्यात आल्या होत्या. या दुरुस्त्यांवर लोकसभेत आवाजी मतदान घेण्यात आले. या मतदानातून सुचविलेल्या 20 दुरुस्त्या रद्द करण्यात आल्या.

दरम्यान, तिहरी तलाक विधेयकावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यां नी सुचवलेल्या दुरुस्त्यांवरही मतदान झाले. पण त्यांच्यासह इतर काही सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्याही मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या.