'ही' आहेत भारतातील हरित शहरं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 15:41 IST2018-08-11T15:13:39+5:302018-08-11T15:41:48+5:30

मैसूर हे भारतातील पहिलं सर्वात स्वच्छ आणि हरित शहर आहे. कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी असलेल्या या शहरातील सुंदर गार्डन, हवेली पर्यटकांना भूरळ पाडतात.
चंदिगड हे भारतातील पहिले नियोजनबद्ध शहर असून ते वास्तुशास्त्र आणि नियोजनबद्धतेसाठी संपूर्ण जगात ओळखले जाते. हिरवळीने सजलेल्या चंदीगडमधील रॉक गार्डन, रोझ गार्डन आणि सुहाना लेकला एकदा तरी नक्की भेट द्या.
ब्रम्हपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गुवाहाटी हे शहर निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. गुवाहाटीतील अप्रतिम ठिकाणं पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर आहे. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे.
डेहराडून ही भारताच्या उत्तराखंड राज्याची राजधानी असून हरित शहरांपैकी एक आहे. डेहराडून शहर उत्तराखंडच्या पश्चिम भागात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डून खोऱ्यामध्ये वसले आहे.
पुणे हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले हे हरित शहर असून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे.