Todays Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घट; चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या आजचा दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:23 PM2022-04-29T12:23:34+5:302022-04-29T12:28:19+5:30

राज्यात लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे.

राज्यात लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

देशात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८,००० आहे, काल ही किंमत ४८,४५० रुपये होती. म्हणजेच सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ४५० रुपयांची घट झाली आहे.

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीचे दर लक्षणीयरित्या घटले आहेत. आज एक किलो चांदीचा दर ६३,८०० आहे. त्याच वेळी, ही किंमत काल ६५,००० होती.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.