शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना राष्ट्रपतींकडे, ना एकट्या पंतप्रधानांकडे; अणुबॉम्बचा कंट्रोल 'या' त्रिमूर्तीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 11:51 AM

1 / 10
जगातल्या अनेक देशांकडे अण्वस्त्रं आहेत. अनेकदा दोन राष्ट्रांमध्ये तणाव निर्माण झाल्यावर अण्वस्त्रं डागण्याची धमकी राष्ट्रप्रमुखांकडून देण्यात येते.
2 / 10
पाकिस्तानकडून मध्यंतरी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्यात आली होते. तर अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला असतानाही अण्वस्त्रांच्या वापराचे इशारे देण्यात आले.
3 / 10
अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या, इशारे देणं सोपं असलं तरी त्यांचा वापर करणं मात्र अजिबात सोपं नाही.
4 / 10
अण्वस्त्रांच्या वापरांमुळे एखादा देश पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. म्हणूनच त्यांचा वापर जबाबदारीनं व्हावा आणि शक्यतो होऊच नये यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.
5 / 10
समोरच्या देशाला धमकावताना अनेकदा राष्ट्रप्रमुख, महत्त्वाचे नेते, अणू बॉम्बचं बटन दाबू अशी धमकी देतात. पण खरंतर असं कुठलंच बटण नसतं.
6 / 10
एखाद्या देशाच्या प्रमुखाकडेही अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी कोणतंही बटन नसतं. भारताचे पंतप्रधानदेखील त्याला अपवाद नाहीत.
7 / 10
भारतीय पंतप्रधानांकडे एक स्मार्टकोड असतो. त्या माध्यमातून ते अण्वस्त्र हल्ल्याचे आदेश देऊ शकतात.
8 / 10
अण्वस्त्र हल्ल्याचे विदारक परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच अण्वस्त्र हल्ल्याचा निर्णय एकटे पंतप्रधान घेऊ शकत नाहीत.
9 / 10
अण्वस्त्र हल्ल्याचा निर्णय घेण्याआधी पंतप्रधानांना कॅबिनेट किंवा सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीचा सल्ला घ्यावा लागतो.
10 / 10
अण्वस्त्र हल्ल्याचा निर्णय घेताना पंतप्रधानांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्याशी सल्लामसलत करावी लागते.
टॅग्स :nuclear warअणुयुद्धIndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाnorth koreaउत्तर कोरियाprime ministerपंतप्रधान