शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zodiac Signs: गोड बोलून काम करून घेण्यात पटाईत असतात या पाच राशींचे लोक, अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:53 IST

1 / 6
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची काही ना काही खास वैशिष्ट्यं असतात. काही लोक स्पष्ट बोलण्यावर विश्वास ठेवतात. तर काही लोक गोड बोलण्यात पटाईत असतात. असे लोक आपल्या गोड बोलण्याने समोरच्याला गुंग करून टाकतात. आज आपण कुठल्या राशीचे लोक गोड बोलण्यात माहीर असतात, ते जाणून घेऊया.
2 / 6
या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध हा बोलण्यातील राजा मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींमध्येही हा गुण दिसून येतो. हे लोक वाकचातुर्याच्या जोरावर लोकांना मोहित करतात आणि आपला कार्यभाग साधून घेतात. यांच्या बोलंदाजीमुळे त्यांना नकार देणंही समोरच्यांना शक्य होत नाही.
3 / 6
कर्क राशीच्या व्यक्तीही आपल्या या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध असतात. त्यांना कुणीही नाही म्हणू शकत नाही. तसेच ते कुणाच्या कामाला नाही म्हणत नाही. मात्र यांच्या मनाला जे काही योग्य वाटेल ते ते करतात. हे लोक भांडण करू शकत नाहीत. त्यामुळे सहजपणे त्यांचं इतरांसोबत जमून जातं.
4 / 6
या राशीच्या व्यक्तीही बोलण्यामध्ये पटाईत असतात. तसेच ते आपलं बोलणं सांगण्यात कचरतात. मात्र जेव्हा कुठलंही काम करून घ्यायचं असेल तर ते खूप प्रेमाने बोलून आपलं काम करून घेतात. लव्ह लाईफ असो वा संसार ह्या व्यक्ती समोरच्याचं मन जिंकून घेतात.
5 / 6
गोड बोलण्यामध्ये या राशीच्या लोकांचा मुकाबला कुणीही करू शकत नाही. पण या राशीच्या व्यक्ती खूप प्रामाणिक असतात. त्यांची बोलण्याची पद्धत अशी आहे समोरची व्यक्ती त्यात सहजपणे गुंतून जाते. असे लोक समोरून समोरून तुमचं कौतुक करतात. पण मागून तुमची उणीदुणी काढतात.
6 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार यादीमध्ये सर्वात खाली दिसणाऱ्या राशींमध्ये मीन राशीचं नाव आहे. मात्र बोलण्यात ही रास चांगलीच पटाईत आहे. हे लोक आपलं काम साधून घेण्यासाठी खूप गोड गोड बोलतात. तसेच ते आपल्या भावना अशाप्रकारे दुसऱ्यांच्या समोर ठेवतात की, समोरची व्यक्ती त्यांच्या जाळ्यात सहजपणे गुंतून जाते.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष