शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:16 IST

1 / 9
जगातील सर्वात सुरक्षित देश कोणते, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. भारतात असुरक्षित वाटणारे आणि युरोप, अमेरिकेत स्थायिक होणारे महाभागही पाहिले असतील. यासाठी डंकीचा जीवघेणा रुट अवलंबणारे देखील हजारो आहेत. परंतू, तुम्हाला माहितीय का, भारतापेक्षा अमेरिकाच जास्त अनसेफ आहे. जगातील दहा सुरक्षित देशांची यादी आली आहे.
2 / 9
नंबेओ नावाच्या एका जागतिक रेटिंग एजन्सीने ही यादी जारी केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या वर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागत आहे. त्यात कडी म्हणजे पाकिस्तानचा भारताच्या एक आकड्याने वरचा क्रमांक लागत आहे.
3 / 9
जगातील १० सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत अँडोरा (८४.७) अव्वल स्थानावर आहे. १० सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिराती ८४.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4 / 9
कतरला जगातील तिसरा सर्वात सुरक्षित देश मानण्यात आला आहे. तैवान ८२.९ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
5 / 9
ओमान ८१.७ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. सुरक्षित देशांच्या यादीत ७९.० गुणांसह आयल ऑफ मॅन सहाव्या क्रमांकावर आहे.
6 / 9
हाँगकाँग ७८.५ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. सुरक्षित देशांच्या यादीत ७७.९ गुणांसह आर्मेनिया आठव्या क्रमांकावर आहे.
7 / 9
सिंगापूर ७७.४ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. जपान ७७.१ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
8 / 9
भारत या यादीत ५५.७ गुणांसह ६६ व्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान ५६.३ गुणांसह ६५ व्या क्रमांकावर आहे.
9 / 9
तर अमेरिका हा ५०.८ गुणांसह ८९ व्या क्रमांकावर आहे. युके हा ५१.७ गुणांसह ८७ व्या क्रमांकावर आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी