शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घोडेबाजार! आमदार खरेदीसाठी १०० कोटी; ४ राज्यांत ७ ठिकाणी छापेमारी, ३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 7:06 PM

1 / 11
तेलंगणाच्या ४ आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.
2 / 11
याप्रकरणी एसआयटीने तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये हरियाणातील फरिदाबादचे धर्मगुरू रामचंद्र भारती, हैदराबादचे व्यापारी नंदकुमार आणि तिरुपतीचे सिंहाजी स्वामी यांचा समावेश आहे. याशिवाय केरळमधील कोची येथील डॉ जग्गू यांच्या घराची झडती घेण्यात आली.
3 / 11
फरीदाबादशिवाय कर्नाटकातील पुत्तूर येथेही धर्मगुरू रामचंद्र भारती यांच्या घराची झडती घेण्यात आली. याशिवाय तिरुपती येथील सिंहाजी स्वामींच्या घराचीही झडती घेण्यात आली. एसआयटीने हैदराबादच्या जुबली हिल्स भागातील व्यापारी नंद कुमार यांच्या घरांवर आणि रेस्टॉरंटवरही छापे टाकले.
4 / 11
एका SIT अधिकाऱ्याने सांगितले- डॉ जग्गू रामचंद्र भारती आणि दुसरे संशयित तुषार यांच्यात समन्वय साधायचा. त्यांना आणि तुषारला आता अटक करता येणार नाही. तुषारने आमदार रोहित रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जग्गू हा तुषारचा जवळचा मानला जातो. एका आमदाराचे नातेवाईक असलेल्या श्रीनिवासने सिंहाजी स्वामी यांच्यासाठी तिरुपतीहून हैदराबादला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते, असा दावा त्यांनी केला.
5 / 11
गेल्या महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपावर आमदार खरेदी केल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते - आमच्या आमदारांना लाच देऊन विकत घेण्याचे काम दिल्लीचे दलाल करत आहेत. तेलंगणातील एका फार्महाऊसमध्ये आमच्या ४ आमदारांना १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, पण केसीआर आमदार विकले जाणार नाहीत. त्यांनी पोलिसांना ऑपरेशन लोटसची माहिती दिली.
6 / 11
आमचे सरकार पाडण्यासाठी भाजप आमचे २०-३० आमदार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक बोलतात की त्यांना तेलंगणा काबीज करायचा आहे. आपण काळजीपूर्वक मतदान करावे. अशा राजकारणामुळे आपण लाच घेण्याच्या भानगडीत पडू शकत नाही. मला भाजपच्या लोकांना विचारायचं आहे की ही क्रूरता का? अजून किती शक्ती हवी आहे? तुम्ही दोनदा निवडून आलात, मग सरकारे का पाडताय? असा सवाल KCR यांनी केला.
7 / 11
सायबराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी दावा केला होता की, टीआरएसच्या आमदारांनीच आम्हाला घोडेबाजाराची माहिती दिली होती. आम्ही अजीज नगर येथील फार्म हाऊसवर छापा टाकला तेव्हा आम्हाला रोख रक्कम आणि धनादेश सापडले. आमदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांचा सौदा झाला असेल असं आयुक्त म्हणाले.
8 / 11
गेल्या ५ वर्षांचा विचार केला तर कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये आमदारांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केल्यामुळे अनेक सरकारे पडली आणि नवीन सरकारे स्थापन झाली. ज्या पक्षांचे आमदार गेले, त्या पक्षांनी आमदारांना विकत घेतल्याचा आरोप केला. राजकारणातील नेत्यांच्या या खरेदी-विक्रीला घोडेबाजार म्हणतात.
9 / 11
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर, भाजप १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. विरोधी राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. सरकार स्थापनेचा मुद्दा आला तेव्हा मुख्यमंत्री कोण होणार यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात बिनसलं.
10 / 11
त्यानंतर शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची योजना आखली. अडीच वर्षाने हे सरकार कोसळले.
11 / 11
या वर्षी २० जून रोजी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केली. महाविकास आघाडीचे सरकार बहुमत चाचणीआधीच कोसळलं. शिंदे यांनी ३० जून रोजी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. ते मुख्यमंत्री झाले, तर भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणा