शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लहानपणीच कमी झाली दृष्टी, वडिलांनी रिक्षा चालवून शिकवलं; लेकाने दोनदा क्रॅक केली UPSC

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:36 IST

1 / 9
अजय आर. राज याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. अजयची दृष्टी लहानपणीच कमी झाली. मात्र त्याच्या वडिलांनी हार मानली नाही आणि रिक्षा चालवून मुलाला दररोज पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
2 / 9
संघर्ष, अश्रू आणि असंख्य रात्रींच्या मेहनतीतून अजयने UPSC सारखी कठीण परीक्षा दोन वेळा क्रॅक केली. स्वप्न केवळ डोळ्यांनीच नाही, तर प्रबळ इच्छाशक्तीनेही पाहिली जातात, हे सिद्ध केलं. अढळ विश्वास, त्याग आणि जिद्दीची ही यशोगाथा आहे.
3 / 9
अजय आर. राज हा केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील थोट्टिलपलम येथील रहिवासी आहे. एका मुलाखतीत सांगितलं की, त्याचं कुटुंब अगदी साधं आहे. वडील रिक्षाचालक आहेत आणि आई गृहिणी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं.
4 / 9
वडिलांनी रिक्षा चालवून केवळ घराचा खर्चच भागवला नाही, तर मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या. जेव्हा तो ८-९ वर्षांचे होता, तेव्हा डोळ्यांची दृष्टी कमी झाली, ज्यामुळे जीवन कठीण झालं.
5 / 9
अजय खूप अस्वस्थ झाला होता. त्याला कोणतीही गोष्ट स्पष्टपणे दिसत नाही. तरीही त्याने या परिस्थितीला आपली कमजोरी बनू दिलं नाही आणि पुढे जाण्याचा संकल्प केला.
6 / 9
दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली स्वप्न सोडली नाहीत. इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. येथून स्वप्नांना बळ मिळालं, कारण त्याचा असा विश्वास होता की मेहनत आणि सततच्या सरावाने कोणत्याही उणिवेवर मात करता येते.
7 / 9
UPSC च्या तयारी दरम्यान आणि पहिल्या २-३ प्रयत्नांमध्ये अजयला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. कधी प्रीलिएम्स तर कधी मुख्य परीक्षेत त्याला यश हुलकावणी देत होतं, पण त्याने हार मानली नाही.
8 / 9
आर्थिक आव्हानांमुळे कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली होती. आपल्या तयारीसोबतच तो पुढे जात राहिला आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवलं. सतत प्रयत्न करत अजयने एकदा नाही तर दोनदा यश मिळवले.
9 / 9
UPSC परीक्षा २०२५ च्या निकालात १०९ वा रँक मिळवला. यापूर्वी ७३० वी रँक मिळवून त्याची रेल्वे सेवेसाठी निवड झाली होती, परंतु आयएएस (IAS) होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या यशाचे श्रेय कुटुंब आणि शिक्षकांना दिलं.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण