By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:39 IST
1 / 9Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला महिना उलटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले आहेत, राजा रघुवंशी याची हत्या त्याचीच पत्नी सोनम रघुवंशी हिने केल्याचे उघड झाले आहे.2 / 9मेघालयातील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले आहे. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तिघांसह तिच्या पती राजा यांची हत्या केली. 3 / 9आता या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. दोन आरोपींनी आधीचा कबुलीजबाब मागे घेतला.4 / 9पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हत्येत पाच जणांचा सहभाग होता, त्यापैकी दोन आरोपी आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांनी गुरुवारी दंडाधिकाऱ्यांसमोर कोणतेही जबाब देण्यास नकार दिला. 5 / 9शिलाँग शहराचे पोलिस अधीक्षक हर्बर्ट खारकोंगोर म्हणाले की, दोन्ही आरोपी गप्प राहिले, त्यांनी कोणतेही जबाब दिले नाहीत. हर्बर्ट हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत.6 / 9पोलिसांनी सांगितले की, 'आम्ही पाचपैकी दोघांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यांनी कोणताही जबाब देण्यास नकार दिला. परंतु आमच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत. आम्ही फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) अहवालाचीही वाट पाहत आहोत.'7 / 9'सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पण आता आकाश आणि आनंद यांनी त्यांचे जबाब मागे घेतल्याने तपासाला एक नवीन वळण मिळाले आहे. तरीही, पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे हत्या सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.8 / 9सोनम २० मे रोजी राजा रघुवंशीसोबत हनिमूनसाठी इंदौरवरून गेली होती. मेघालयात फिरत असताना २३ मे रोजी अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि प्रकरणातील गुढ वाढले. पण, या सगळ्यामागे सोनमचं मुख्य सूत्रधार निघाली. 9 / 9शिलाँगमध्ये फिरत असताना सोनम राजाला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन जण होते. तिथे राजाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आणि मृतदेह दरीत टाकण्यात आला. हत्येच्या प्रकरणात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सोनमने तिच्या अंगावरील पांढरा शर्ट आणि पर्सही मृतदेहाशेजारीच टाकली होती. २३ मे रोजी राजाची हत्या केल्यापासून ती फरार होती.