शिलाँगचा cherry blossom festival घालतोय पर्यटकांना भुरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 22:04 IST2018-11-23T22:01:29+5:302018-11-23T22:04:42+5:30

भारतातल्या उत्तर-पूर्वेकडे असलेलं राज्य मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाँगमध्ये cherry blossom festival उत्साह शिगेला पोहोचला आहे.
या मोसमात रस्त्येही फुलांनी आच्छादलेले असतात. रस्त्यांवर जागोजागी तुम्हाला फुलांची चादर पांघरलेली दिसते.
नोव्हेंबरच्या महिन्यात इथं गुलाबी रंगांची फुलं फुलत असल्यानं मेघालय सरकार या दिवसांत cherry blossom festivalचं आयोजन करते.
14 ते 17 नोव्हेंबरपर्यंत cherry blossom festival सुरू असतो.
गुलाबी रंगाच्या चेरी ब्लॉसमच्या फुलांमुळे शिलाँगलाही गुलाबी रंगानं शालू पांघरल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळतं.