सिक्युरिटी, बाउन्सर, लक्झरी कार्स.., असं आहे करौली आश्रमाचे बाबा संतोष भदौरिया यांचं राहणीमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:34 AM2023-03-24T08:34:21+5:302023-03-24T08:41:57+5:30

करौली आश्रमाचे बाबा संतोष भदौरिया हे काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. परंतु काही वर्षांमध्ये संतोष भदोरिया यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमवली.

उत्तर प्रदेशातील करौली आश्रमाचे बाबा संतोष भदौरिया, एका भक्तासोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर चर्चेत आले. परंतु काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र काही वर्षांत संतोष भदोरिया यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवली.

बाबांच्या आश्रमात कोट्यवधी रुपयांची वाहनं आहेत. ते ज्या कारमधून प्रवास करतात त्याची किंमत अडीच कोटी रुपये आहे. आश्रमात उभी केलेली इतर वाहने त्यांच्या ताफ्याचा भाग असतात. यामध्ये त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि बाउन्सर प्रवास करतात.

करौली बाबा संतोष सिंह भदोरिया यांच्यावर एका भक्तानं मारहाणीचा आरोप केलाय. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. बाबा आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची गर्दी होत असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर आश्रमात भाविकांना १०० रुपयांची पावतीदेखील फाडावी लागते.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सिंह भदोरिया उर्फ ​​करौली बाबा जेव्हा कोळसा महामंडळाचे अध्यक्ष बनले त्यावेळी ते प्रसिद्धीझोतात आले. मात्र, ही प्रसिद्धी काही दिवसांसाठीच टिकलं. करौली बाबांवर अनेक गुन्हेगारी आरोप लावण्यात आले आहेत. १९९२-९५ दरम्यान त्यांच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

बाबांनी करौली आश्रम बांधला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम शनि मंदिर बांधलं. यानंतर त्यांनी आणखी काही जमीन खरेदी करून करौली आश्रम सुरू केला. या आश्रमात आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यात आलं. यानंतर कामाख्या मातेचे मंदिर बांधण्यात आलं, त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या तंत्र-मंत्राचा प्रचार सुरू केला. करौली बाबा काही वेळातच खूप प्रसिद्ध झाले.

करौली बाबा बनल्यानंतर धनवर्षाव सुरू झाला. यानंतर त्यांनी तीन वर्षांत कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. त्यांचा आश्रम १४ एकरांवर पसरलेला आहे. दररोज ३ ते ४ हजार लोक आश्रमात पोहोचतात. येथे येणाऱ्या भाविकांना प्रथम १०० रुपयांची पावती फाडावी लागते. त्यानंतर तब्बल ५ हजारांपेक्षा अधिक खर्च येतो.

या आश्रमात सातत्यानं होम होतो. करौली बाबा संतोष भदोरिया स्वतः होम करण्याचा मंत्र देतात. या हवनाचा खर्च ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे. काही विशेष करायचं असेल तर खर्चाला मर्यादा नाही.

करौली बाबा यांनी अनेक दावे केले आहेत दावे केले आहेत. प्रयागराज हत्याकांडातील आरोपी अतीक अहमदच्या शुटर्सना शोधण्यात उत्तर प्रदेश पोलिसांची मदत केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी एका दिवसाचा विधी करण्यास सांगितला होता. तसंच आपण भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारू शकतो असा दावाही त्यांनी केला होता.

करौली बाबा यांनी अनेक दावे केले आहेत दावे केले आहेत. प्रयागराज हत्याकांडातील आरोपी अतीक अहमदच्या शुटर्सना शोधण्यात उत्तर प्रदेश पोलिसांची मदत केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी एका दिवसाचा विधी करण्यास सांगितला होता. तसंच आपण भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारू शकतो असा दावाही त्यांनी केला होता.

दरम्यान, डॉक्टराला झालेल्या मारहाणीप्रकरणी कानपूर पोलीस बुधवारी करौली बाबांच्या आश्रमात पोहोचले होते. पोलिसांनी बाबाची अर्धा तास चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आपण वकिलांच्या समोरच बोलू असं त्यांनी सांगितलं. तसंच पोलिसांना या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाही.