मुंबईत देशातल्या पहिल्या सी प्लेनची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 19:47 IST2017-12-09T19:37:44+5:302017-12-09T19:47:55+5:30

देशातलं पहिलंवहिलं सी प्लेन मुंबईतील गिरगाव चौपाटीवर उतरलं. गिरगाव चौपाटीवर या सी प्लेनचं पहिलं प्रात्याक्षिक पार पडलं.

कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उड्डाण वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते.

स्पाईसजेट कंपनीची ही सी प्लेन आहेत. अशी तब्बल 100 सी प्लेन सुरु करण्याचा स्पाईसजेटचा विचार आहे.

विमानात 10 ते 14 जण प्रवास करु शकतात.