सर्वनाश जवळ आलाय? तमिळानाडूच्या किनाऱ्यावर Doomsday Fish आढळल्याने एकच चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:43 IST2025-10-07T18:39:25+5:302025-10-07T18:43:55+5:30
तामिळनाडूच्या किनाऱ्यावर नुकताच Doomsday Fish नावाचा एक दुर्मिळ आणि रहस्यमय मासा पकडण्यात आला. जपानी पौराणिक कथांनुसार हा मासा पृष्ठभागावर दिसणे हे नैसर्गिक आपत्तींचे लक्षण मानले जाते.

तामिळनाडूतील पंबनजवळील समुद्रात मच्छिमारांच्या जाळ्यात एक मासा सापडला, जो भेटण्याचा अर्थ प्रलय येण्याचे संकेत देतो. सोमवारी, मच्छिमारांना हा दुर्मिळ मासा सापडला, ज्याला "Doomsday Fish" असे म्हटलं जातं.
रविवारी रामेश्वरम मासेमारी बंदरातून मच्छीमार निघाले आणि मन्नारच्या आखाताजवळ मासे पकडल्यानंतर परतले. त्याना मासे बाजूला काढताना एक विचित्र, पातळ मासा आढळला.
या विचित्र माशाला "डुम्सडे फिश" म्हणतात. तो सापडल्याने एक महाभयंकर घटना जवळ आली आहे किंवा त्सुनामी किंवा भूकंप सारखी गंभीर समुद्री आपत्ती जवळ आली आहे असे सूचित होते.
हा मासा खूपच चमकदार आहे आणि त्याचे वजन अंदाजे ६ किलोग्रॅम आहे. मूळतः "ओअर फिश" म्हणून ओळखले जाणारे हे मासे खोल पाण्यात राहतात आणि क्वचितच मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात.
हा मासा एक प्रलयकारी मासा मानला जातो कारण जेव्हा जेव्हा तो जपानी किनारपट्टीवर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला आहे किंवा किनाऱ्यावर वाहून आला तेव्हा त्याच्यासोबत भूकंप, त्सुनामी किंवा नैसर्गिक आपत्ती आली.
या माशाचे केवळ दर्शन हे विनाशाचे संकेत देते. म्हणूनच याला डूम्सडे फिश म्हणून ओळखले जाते. जपानसह अनेक देशांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर हा मासा दिसणे भूकंप किंवा इतर आपत्तीचे लक्षण मानले जाते.