मस्तकावर हिरे-माणकांचा टिळा, भव्य, दिव्य आणि अलौकिक आहे रामललांचा श्रृंगार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:44 PM2024-01-22T17:44:28+5:302024-01-22T17:50:38+5:30

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये अखेर रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. आज झालेल्या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर समोर आलेलं रामललांचं सुंदर रूप पाहून सर्वजण तल्लीन झाले आहेत. या सोहळ्यासाठी रामललांच्या मूर्तीला विविध आभूषणांनी सजवण्याच आलं होतं. रामललांचा हा अलौकिक आणि विलोभनीय शृंगार कसा होता, याची माहिती पुढील प्रमाणे.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये अखेर रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. आज झालेल्या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर समोर आलेलं रामललांचं सुंदर रूप पाहून सर्वजण तल्लीन झाले आहेत. या सोहळ्यासाठी रामललांच्या मूर्तीला विविध आभूषणांनी सजवण्याच आलं होतं. रामललांचा हा अलौकिक आणि विलोभनीय शृंगार कसा होता, याची माहिती पुढील प्रमाणे.

अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेल्या रामललांचं रूप जेवढं दिव्य आहे, तेवढाच त्यांच्या शृंगारासाठी वापरलेल्या वस्तूही मौल्यवान आहेत. सोने, हिरे, माणिक वापरून रामललांचा शृंगार करण्यात आला होता. हा शृंगार जेवढा सुंदर आहे की तो पाहिल्यावर त्यावरून नजरही हटणार नाही.

रामललांच्या माथ्यावर हिरे आणि माणकांसारख्या रत्नांचा टिळा लावण्यात आलेला आहे. या नामामधील पांढऱ्या भागात हिरे जडवलेले आहेत. तर मध्ये माणिक लावलेले आहेत.

रामललांचा मुकुट हा मौल्यवाना रत्नांनी तयार केलेला आहे. या मुकुटाची भव्यता राजमुकुटासारखी आहे. मुकुटामध्ये हिरे, मोती, जवाहिज जडवलेले आहे.

रामललांनी मौल्यवान रत्नजडीत हार धारण केलेला आहे. कमरेवरही हिरे आणि मोत्यांनी मढवलेला कमरपट्टा आहे. या दागिन्यांचे सौंदर्य आणि आभा पाहण्यासारखी आहेत.

प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी रामललांना रेशमी पितांबरी वस्त्र परिधान करण्यात आलं. रामललांचा पोशाख आणि शृंगार वैभवशाली राजाप्रमाणे आहे.

श्याम वर्णी बालरूपातील प्रभू श्रीरामललांची मूर्ती उभी आहे. रामललांच्या हातात सोनेरी धनुष्य आणि बाण हातात धारण केलेला आहे.