गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; 138 लोकांना NDRF ने एअरलिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:13 IST
1 / 7गुजरातच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरामध्ये शाळा-कॉलेज बंद करण्यात आलेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस आणि एनडीआरएफ जवान तैनात आहेत. 2 / 7NDRF च्या टीमने IAF C 130 या एअरक्राफ्टमधून 138 लोकांना वाचविले आहे. रात्री उशीरापर्यंत प्रशासनाकडून हे बचावकार्य सुरु होते. लोकांना वाचविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. 3 / 7वडोदरामध्ये बुधवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविलं आहे. 4 / 7वडोदरासोबत अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी भरलं आहे. पुरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 5 / 7पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून मदतकार्य केलं जात आहे. 6 / 7वडोदरामध्ये पुराच्या पाण्यात नागरी वस्तीत मगर आढळल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. या मगरीने वस्तीत पुराच्या पाण्यात असणाऱ्या कुत्र्यावर झडप घातली पण कुत्रा थोडक्यात बचावला. 7 / 7तसेच पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसही सज्ज आहे. एक महिन्याच्या मुलीला पोलीस निरीक्षक जी. के चावडा यांनी डोक्यावर टोपली घेऊन खांद्यापर्यंतच्या पाण्यातून बाहेर काढले याचं कौतुकही होताना पाहायला मिळत आहे.