राहुल गांधी यांच्या कँडल मार्चला इंडिया गेटवर अभूतपूर्व गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 01:16 AM2018-04-13T01:16:49+5:302018-04-13T01:16:49+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कँडल मार्चला अभूतपूर्व अशी गर्दी जमली होती.

हातात मेणबत्ती घेऊन महिला या कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या.

उन्नाव-कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ हा कँडल मार्च काढण्यात आला होता.

महिलांबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही या मार्चमध्ये सहभाग घेत बलात्काराच्या घटनेचं कोणीही समर्थन करू शकत नसल्याचे पोस्टर झळकावले.