Rashtrapati Bhavan : ३४० खोल्या, ४५ लाख विटा, १७ वर्षे; असं तयार झालं होतं राष्ट्रपती भवन, पाहा खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:15 AM2022-07-18T10:15:27+5:302022-07-18T10:31:25+5:30

Facts About Rashtrapati Bhavan: सेंट्रल डोम ही राष्ट्रपती भवनाची ओळख आहे. पाहूया काय आहे राष्ट्रपती भवनाची खासियत.

All You Need To Know About Rashtrapati Bhavan: दिल्लीत असलेलं राष्ट्रपती भवन पाहायला अतिशय भव्य आणि सुंदर दिसतं. परंतु राष्ट्रपती भवनाच्या आतही अनेक उत्तम गोष्टी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या राष्ट्रपतींचं हे निवासस्थान. स्वातंत्र्यापूर्वी ते ब्रिटीश व्हॉईसरॉयचं निवासस्थान होतं. १९११ मध्ये भारताची राजधानी कलकत्याहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी याची निर्मिती करण्यात आली. राष्ट्रपती भवनाच्या निर्मितीसाठी १७ वर्षांचा कालावधी लागला.

राष्ट्रपती भवनाची इमारत चार मजली आहे आणि यात ३४० खोल्या आहेत. राष्ट्रपती भवनाच्या निर्मितीसाठी ४५ लाख विटांचा वापर करण्यात आला आहे. तसंच यात इमारतीशिवाय यात मुघल गार्डन आणि कर्मचाऱ्यांचं निवासस्थानही आहे. याची निर्मिती एडविन लँडसीयर ल्युट्येन्स यांनी केली.

राष्ट्रपती भवनाच्या आत दरबार हॉलमध्ये २ टन वजनाचा झुंबर ३३ मीटर उंचीवर आहे. ब्रिटीश राजवटीत दरबार हॉलला सिंहासन हॉल असे संबोधले जात असे. यामध्ये व्हाईसरॉय आणि व्हाईसरीनसाठी दोन सिंहासने होती. मात्र, आता त्यात एकच खुर्ची आहे आणि राष्ट्रपतींसाठी आहे. याशिवाय ५ व्या शतकातील गौतम बुद्धांचीही एक मूर्ती या ठिकाणी आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रपतींच्या खुर्चीपासून एक रेषा काढली तर ती सरळ राजपथातून जात दुसरीकडे इंडिया गेटच्या मध्यभागी जाऊन मिळते. या सभागृहाचा उपयोग राजकीय समारंभ, पारितोषिक वितरणासाठी केला जातो.

राष्ट्रपती भवनाची सर्वात मोठी ओळख म्हणजे सेंट्रल डोम आहे. हे एका ऐतिहासिक सांची स्तुपाची आठवण करून देते. राष्ट्रपती भवनातील खांबांवर घटांचं डिझाईन आहे. यांना डेली ऑर्डरही म्हटलं झालं. जर घंटा स्थिर असतील तर सत्ता स्थिर आणि दीर्घ कालावधीसाठी चालते असं ब्रिटीश मानत असत. यासाठीच त्या तयार करण्यात आल्या होत्या.

राष्ट्रपती भवनाच्या मार्बल हॉलमध्ये पाचवे किंग जॉर्ज आणि महाराणी मेरी यांच्या प्रतिमा आहे. याशिवाय माजी व्हॉईसरॉय आणि गव्हर्नल जनरल यांचेही फोटो आहेत. तर महाराणीनं वापरलेलं चांदीचं सिंहासनही या ठिकाणी आहे. ब्रिटीश राजमुकूटाची पितळ्याची प्रतिकृतीही या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

नॉर्थ ड्रॉईंग रुममध्ये राष्ट्रपती अन्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतात. याठिकाणी दोन विशेष फोटो फोटोत आहेत. यात एसएन घोषाल यांचा १४ ऑगस्ट रोजीचा सत्ता हस्तांतरणाच्या वेळचा आणि ठाकूर सिंह यांच्याद्वारे पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरल यांच्या शपथविधी समारंभाचा फोटो या ठिकाणी आहे.

या हॉलमध्ये १०४ जणांच्या बसण्याची सोय आहे. यापूर्वी त्याला डायनिंग हॉल असं संबोधलं जात होतं. त्यानंतर याला बँक्वेट हॉल असं म्हटलं जात होतं. माजी राष्ट्रपतींचे फोटो या भितींवर लावण्यात आले आहेत. येलो ड्राईंग रूमचा वापर छोट्या कार्यक्रमांसाठी याचा वापर केला जातो. कोणत्याही एका मंत्र्याचा शपथविधी सोहळा असोल किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांचा शपथविधी सोहळा असो यासाठी याचा वापर केला जातो. यासोबतच एक ग्रे ड्राईंग रूम आहे. याचा वापर पाहुण्यांच्या स्वागतासाठी केला जातो.

राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये मोठ्या सोहळ्यांचं आयोजन केलं जातं. याच्या छतावर देशातीलच नाही तर अन्य देशातील सम्राटांच्या पद्धतींची झलक पाहायला मिळते. अशोका हॉलमध्ये लागलेले कार्पेट ५०० कामगारांच्या दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आले होते.

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन १५ एकरांमध्ये पसरलेले आहे. हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गार्डनमध्ये ब्रिटीश आणि इस्लामिक दोन्ही प्रकारची झलक पाहायला मिळते. हे गार्डन तयार करण्यासाठी एडविन ल्युटियन यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यासही केला होता. या ठिकाणी झाडं लावण्याचं काम १९२८ मध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि ते वर्षभर सुरू राहिलं.