भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:42 IST2025-04-26T16:39:48+5:302025-04-26T16:42:57+5:30

Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्धाचा भडका उडू शकतो, असं वातावरण तयार झालं आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांकडे असलेल्या लष्करी सामर्थ्याचाही आढावा घेतला जात आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्धाचा भडका उडू शकतो, असं वातावरण तयार झालं आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांकडे असलेल्या लष्करी सामर्थ्याचाही आढावा घेतला जात आहे.

पाकिस्तानविरोधात थेट लष्करी कारवाईचे कुठलेही संकेत अद्याप भारताकडून देण्यात आलेले नाहीत. मात्र भारताकडे अशी शक्तिशाली क्षेपणास्त्रं आहेत. ज्यांच्या माध्यमातून पाकिस्तानमधील अनेक मोठी शहरं नकाशावरून मिटवली जाऊ शकतात.

भारताच्या शस्त्रसामुग्रीचा विचार केल्यास भारताकडे दोन अशी क्षेपणास्त्रं आहेत. जी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणू शकतात. पाकिस्तानमधील अनेक शहरं ही भारतापासून अगदी जवळ आहेत. तसेच या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात ही सर्व शहरं येतात. भारतातील अमृतसरपासून पाकिस्तानमधील लाहोर हे शहर केवळ ५५ किलोमीटर आहे. तर अमृतसरपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ही केवळ २८७ किमी आहे. तर पाकिस्तानमधील प्रमुख बंदर आणि आर्थिक केंद्र असलेलं कराची हे भारतातील भूजपासून ३२५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या शहरांवर हल्ला करणं भारतासाही सहज सोपं आहे.

भारताकडे असलेल्या या दोन शक्तिशाली अस्त्रांपैकी अग्नी-५ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या भारताने अनेकदा यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. हे क्षेपणास्त्र ५ हजार ५०० किमीहून अधिक अंतरापर्यंतच्या लक्ष्याला भेदण्यास सक्षम आहे. तसेच हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत अण्वस्त्रंही वाहून नेण्यास सक्षम आहे. पाकिस्तानमधील सर्वच प्रमुख शहरं या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहेत. त्याशिवाय युरोप आणि आफ्रिका खंडातील काही देशांपर्यंतही हे क्षेपणास्त्र मारा करू शकतं.

ब्राह्मोस क्रूज क्षेपणास्त्रही भारताकडील शस्त्रास्त्रांपैकी एक आहे. हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेलं आहे. या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे प्रक्षेपित करताना त्या दिलेलं लक्ष्य जागचं हललं तरी त्याला सोडत नाही. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किमी एवढी आहे. मात्र ती ५०० किमीपर्यंत वाढवता येते. अनेक देशांनी भारताकडून हे क्षेपणास्त्र खरेदी केलेलं आहे. आता भारत ब्राह्मोस हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करत असून, त्याची मारक क्षमता १५०० किमी असेल. बता दें कि भारत ब्रह्मोस हाइपरसोनिक मिसाइल विकसित कर रहा है. इसकी रेंज 1500 किमी तक हो सकती है.