लसीकरणासाठी ॲप नव्हे, वेबसाईट!, सरकारकडून संभ्रम दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 08:03 IST
1 / 10नवी दिल्ली : प्रत्येकाला कोरोनावरची लस मिळावी यासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेतील नोंदणीसाठी को-विन हे ॲप विकसित केले आहे. 2 / 10प्ले स्टोअरवर असलेले हे ॲप केवळ ॲडमिनिस्ट्रेटर्ससाठीच उपलब्ध असून लसीकरणासाठी नोंदणी आणि आरक्षण केवळ पोर्टलद्वारेच करता येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.3 / 10१ मार्चपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यात ६० वर्षे वयावरील तसेच ४५ वर्षे वयावरील; परंतु सहव्याधी असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. 4 / 10लसीकरण नावनोंदणीसाठी को-विन ॲप विकसित केले आहे. मात्र, अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने केंद्र सरकारने वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे.5 / 10www.cowin.gov.in वर नोंदणी कधीही आणि कुठेही करता येणार आहे. तसेच, आरोग्य सेतू ॲपद्वारेही नोंदणी करणे शक्य आहे. याशिवाय, नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊनही लाभार्थ्यांना नाव नोंदणी करता येणार आहे. नावनोंदणीवेळी मोबाइल नंबरचा वापर करून लाभार्थी हे अकाउंट पाहू शकेल. 6 / 10तसेच, लाभार्थ्याचा समावेश, त्यांच्या तपशिलाचे संपादन आणि अपॉइंटमेंट निश्चित करणे इत्यादी पर्याय या अकाउंटवर उपलब्ध असतील.प्रत्यक्ष लस मिळेपर्यंत या तपशिलात बदल करता येतील. लसीकरणानंतर तपशिलात बदल करण्याचा पर्याय बंद होईल.7 / 10आपल्या मोबाइल नंबरद्वारे नागरिक को-विन पोर्टलवर नावनोंदणी करू शकतील. मोबाइल नंबरच्या निश्चितीसाठी नोंदणीपूर्वी लाभार्थ्याला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) प्राप्त होईल. नोंदणीनंतर संबंधित व्यक्तीचे को-विन अकाउंट तयार होईल.8 / 10आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, एनपीआर स्मार्ट कार्ड, पेन्शन डॉक्युमेंट यापैकी एक डॉक्युमेंट नाव नोंदणीसाठी अपलोड करावे लागेल.9 / 10६० वर्षे वयावरील वा १ जानेवारी २०२२ रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण करणारे सर्व ज्येष्ठ नागरिक. तसेच, १ जानेवारी २०२२ रोजी ४५ ते ५९ या वयोगटातील कोणतेही वय पूर्ण करणारे सर्व नागरिक.10 / 10याचबरोबर,४५ ते ५९ या वयोगटातील लोकांना सहव्याधी असल्यास त्याचे वेगळे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने २० सहव्याधी यादी निर्दिष्ट केल्या असून त्या असणाऱ्यांना लस दिली जाणार आहे.