Omicron Live Updates: ओमायक्रॉनसे डरना मना है! फक्त काळजी घ्या, या पाच अपडेट भीती घालवतील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:39 PM2021-12-06T16:39:06+5:302021-12-06T16:44:26+5:30

Omicron Positive, Good news: भारतात आलेला पहिला ओमायक्रॉन बाधित हा बरा होऊन त्याच्या देशात परतला सुद्धा आहे. तेव्हा तर ओमायक्रॉन व्हायरसची कोणाला माहितीदेखील नव्हती. देशात सध्या 21 रग्ण सापडले आहेत.

ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरात वाढत असताना आता देशातही मोठ्या वेगाने सापडू लागले आहेत. ओमायक्रॉनमुळे लसीचे दोन डोस घेतलाला व्यक्तीही संक्रमित होत आहे. याचाच अर्थ तुम्ही लस घेतली असेल तरी देखील ओमायक्रॉन तुम्हाला बाधित करू शकतो. यामुळे कोरोनाचे नियम पाळणे, काळजी घेणे या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत.

ओमायक्रॉन जेवढा सांगितला जात होता, तेवढा तो घातक नाहीय. कदाचित सुरुवातीला लस घेतलल्यांना झाल्याने किंवा त्यांच्याद्वारे इतर देशांत पसरल्याने त्याची तीव्रता तेवढी नसेल. कारण भारतात आलेला पहिला ओमायक्रॉन बाधित हा बरा होऊन त्याच्या देशात परतला सुद्धा आहे. तेव्हा तर ओमायक्रॉन व्हायरसची कोणाला माहितीदेखील नव्हती. देशात सध्या 21 रग्ण सापडले आहेत.

काही राज्यांत लॉकडाऊन होण्याच्या अफवा सुरु झाल्या आहेत. यामुळे कामगारांनी आधीच पलायन करण्यास सुरुवात केली आहे. भारतासह 40 देशांत ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यासाऱ्या भीतीच्या, दहशतीच्या वातावरणात तुम्हाला घाबरायचे नाहीय. डरना मना है, फक्त काळजी घ्या. सतर्क रहा.

एम्स बीबीनगरचे एक्‍जीक्‍यूटिव डायरेक्‍टर डॉ विकास भाटिया यांनी सांगितले की, नवा व्हेरिअंट सर्वाधिक संक्रमक असला तरी कमी जिवघेणा आहे. एनआयशी बोलताना ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेची तयारी आपल्याला करावी लागेल. जगातून अद्याप कोणाच्या मृत्यूची बातमी आलेली नाही. हलका आजार वाटतो. डेल्टापेक्षा जास्त वेगाने संक्रमित करतो, हा व्हायरस लोकांमध्ये इम्युनिटी तयार करण्यास मदतच करणार आहे.

ओमायक्रॉनने दक्षिण आफ्रिकेत ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना संक्रमित केले आहे. इन्साकॉगच्या एका सदस्यानुसार भारतातील मुलांना हा व्हायरस त्या प्रकारे प्रभावित करणार नाही. तर NIBMG चे संचालक डॉ सौमित्र दास यांनी म्हटले की, हे सांगणे सध्या घाईचे ठरेल. इम्‍युन सिस्‍टिम, संक्रमणाचे जुने प्रकारांमध्ये शरीराची शक्ती समजून घ्यावी लागेल. कोणत्याही व्हायरसची कार्यप्रणाली ठरविण्यात याची महत्वाची भूमिका आहे.

जगभरातून येत असलेली माहिती पाहता, ओमायक्रॉनमुळे कोणीही खूप गंभीर स्थितीत गेलेला नाही. लस घेतलेल्यांमध्ये कमी लक्षणे दिसत आहेत. हा व्हायरस लसीची सुऱक्षा नक्कीच भेदू शकतो.

आफ्रिकेमध्ये सर्वात पहिल्यांदा हा व्हेरिअंट सापडला. राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा यांनी सांगितले की, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत पण हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या एवढी नाहीय की चिंता वाढेल. काही लोकांनाच अन्य आजारांमुळे भरती व्हावे लागले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार फाऊची यांनी ओमायक्रॉन जरी वेगाने वाढत असला तरी सुरुवातीच्या संकेतांनुसार हा व्हायरस डेल्टापेक्षा कमी धोकादायक आहे. उलट डेल्टामुळेच हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वैज्ञानिकांना आणखी माहिती गोळा करायला हवी.