शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकदा नव्हे, तर दोनदा लग्न केलीत या राजकारण्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 8:53 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या राजकीय नेत्यांचीही कमी नाही. राजकारणातही असे अनेक नेते आहेत, ज्यांनी लग्न झालेलं असतानाही विवाहबाह्य संबंध ठेवले होते. विनोद खन्ना बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते असले तरी ते एक राजकारणी होते. विनोद खन्नांनीही आयुष्यात दोनदा लग्न केलं. पहिल्यांदा त्यांनी गीतांजली यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर 1990मध्ये त्यांनी कविताबरोबर दुसरं लग्न केलं.
2 / 8
शशी थरूर- शशी थरूर यांनीही एक, दोन नव्हे, तर तीनदा लग्न केलं आहे. शशी थरूर यांनी पहिलं लग्न तितोत्मा मुखर्जी, तर दुसरं लग्न ख्रिस्टा गिलशी केलं होतं. त्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा सुनंदा पुष्कर यांच्याशी लग्न केलं. सुनंदा पुष्कर सध्या हयात नाहीत.
3 / 8
राम जेठमलानी- जेठमलानी यांच्या पालकांनी 1942मध्ये त्यांचं लग्न दुर्गा नावाच्या मुलीशी लावलं होतं. त्यावेळी ते फक्त 18 वर्षांचे होते. पहिली पत्नी असतानाही जेठमलानींचे विवाहबाह्य संबंध होते. जेठमलानी वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांची कराचीमध्ये वकील रत्ना शाहानी यांच्याशी भेट झाली आणि या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लपूनछपून लग्न केलं होतं.
4 / 8
किरण खेर- किरण खेर या अभिनेत्रीबरोबरच एक खासदार आहेत. त्यांनी आयुष्यात दोनदा लग्न केलं. पहिल्यांदा त्यांचा विवाह व्यावसायिक गौतम बेरी यांच्याबरोबर झाला. कालांतरानं त्यांची भेट अनुपम खेर यांच्यासोबत झाली आणि अनुपम खेर यांच्या त्या प्रेमात पडल्या. किरण आणि अनुपम खेर यांनी पहिलं लग्न झालेलं असतानाही दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
दिग्विजय सिंह- दिग्विजय सिंह यांनीही आयुष्यात दोनदा लग्न केलं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव आशा होते. 2013मध्ये आशा यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी वरिष्ठ पत्रकार अमृता सिंह यांच्याबरोबर 2015मध्ये लग्न केलं.
6 / 8
कपिल सिब्बल- कपिल सिब्बल यांनीही दोनदा विवाह केला होता. सिब्बल यांची पहिली पत्नी नीनाचा मृत्यू कर्करोगानं झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रेमिला हिच्याशी विवाह केला.
7 / 8
एन. टी. रामाराव- नंदमुरी तारक रामाराव म्हणजेच एन. टी. रामाराव यांनी दोनदा लग्न केलं. त्यांना एनटीआर नावानंही ओळखलं जातं. त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं होतं. रामाराव यांनी 1942मध्ये मामाची मुलगी बासव तारकम यांच्याशी पहिला विवाह केला. त्यानंतर वयाच्या 70व्या वर्षी यांनी तेलुगू लेखिका लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरं लग्न केलं.
8 / 8
रामविलास पासवान- रामविलास पासवान हेसुद्धा दोनदा लग्न करून मोकळे झाले आहेत. पासवान यांची पहिली पत्नी रिना ही हरियाणाची रहिवासी आहे. रिना आणि पासवान यांनी 1982मध्ये लग्न केलं. तर पासवान यांच्या दुसऱ्या पत्नीचं रत्ना पासवान असं नाव आहे.
टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरVinod Khannaविनोद खन्नाShashi Tharoorशशी थरूरkapil sibalकपिल सिब्बल