Narendra Modi: PM मोदींनी परिधान केलेली शाल चर्चेत, जाणून घ्या किंमत अन् खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 02:59 PM2022-12-05T14:59:34+5:302022-12-05T18:19:29+5:30

गुजरात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. त्यासाठी, मोदींनी आज मतदान केले.

गुजरात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. त्यासाठी, मोदींनी आज मतदान केले.

यादरम्यान, नरेंद्र मोदींनी रविवारी गांधी नगरमध्ये आई हिराबेन मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी, आईसोबत गप्पागोष्टी करत त्यांनी आईचा आशीर्वादही घेतला.

आईशी गप्पा मारताना मोदींनी जी शॉल अंगावर घेतली होती त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण, या शालची किंमत तब्बल १ लाख ३४ हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही केलं जात आहे. मात्र, यापूर्वीही मोदींनी ही शाल वापरली होती.

एका ऑनलाईन वेबसाईटवर मोदींकडे असलेल्या शालसारख्याच शॉलची किंमत तब्बल १६५० अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास १ लाख ३४ हजार रुपये इतकी आहे. ही शाल काश्मीरी असून सरकारने कृषी कायदे वापस घेतल्याची घोषणा करतेवेळी मोदींनी अशीच शाल परिधान केली होती.

मोदींनी परिधान केलेली ही शाल नारंगी रंगाची कानी जमावार पश्मीना शाल आहे. ही शाल काश्मीरमध्ये बनली जाते. येथील काश्मीरी कानी कारागिर या शालची निर्मित्ती करतात.

विशेष म्हणजे ही शाल हातवर वीणकाम केलेल्या धाग्यांनी बनविण्यात येते. ७० पेक्षा अधिक खिळे किंवा लाकडाच्या सुयांचा वापर करुन ही शाल बनविण्यात येते. यात वापरण्यात येणारे सूत हे काश्मीरी पश्मीनाचे उच्चतम दर्जा असलेले आहे.

हा काश्मीरी पश्मीना केवळ लद्दाखमध्ये आढळून येतो. मोदींजवळ असलेली ही शाल कानी धाग्यांपासून विणलेली सर्वात टॉपची शाल आहे. ही एक शाल बनविण्यासाठी तब्बल ६ महिन्यांचा कालावधी लागतो.

या शालची पूर्णपणे हस्तनिर्मित्ती केली जाते, काश्मीरी पश्मीना हा नैसर्गिक रुपात हत्तीच्या दातांच्या आणि भुऱ्या रंगाचा असतो. ज्याला रंगीत करण्यासाठी इतर १५ प्रक्रियेतून जावे लागते.

purekashmir.com या वेबसाईटवर जाऊन आपण अशा प्रकारची शाल ऑर्डर करु शकता. सध्या मोदींनी परिधान केल्याने आणि किंमतीमुळे ही शाल देशात चर्चेत आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी जे टीशर्ट घातलं होतं त्याची किंमत ४१ हजार रुपये इतकी होती. यावरून भाजपानं त्यांना ट्रोल केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता क्राँग्रेस समर्थक मंडळी मोदींना ट्रोल करत आहेत.