शौचालयासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: रचल्या विटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 20:25 IST2017-09-23T20:23:51+5:302017-09-23T20:25:37+5:30

स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करत स्वच्छतेचा संदेश देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालयासाठी खड्डा खोदून भूमिपूजन केलं.

वाराणसी दौ-यातील शेवटच्या दिवशी शहंशाहपूर गावात स्वच्छ भारत अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला होता.

शहंशाहपूरमध्ये शौचालयाची पायाभरणी केली आहे. तेथे शौचालयावर इज्जतघर असं नाव देण्यात आलं आहे.

ज्यांना आपल्या इज्जतची चिंता आहे ते नक्कीच इज्जतघर बांधतील'. शौचालयांना ‘लज्जा रक्षणाचं घरं’ असं नाव दिलं पाहिजे, अशी अपेक्षा मोदींनी यावेळी व्यक्त केली.