Maha Kumbh Mela 2025 : जबरदस्त नजारा! अवकाशातून महाकुंभ कसा दिसतो? नासाच्या अंतराळवीरांनी शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:10 IST2025-01-27T13:03:41+5:302025-01-27T13:10:43+5:30

Maha Kumbh-Mela 2025 : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू असून जगभरातून लाखो भाविक महाकुंभ मेळासाठी आले आहेत.

Maha Kumbh-Mela 2025 : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. जगभरातून लाखो भाविक आले आहेत.

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहे. देशातील दिग्गज लोकांनी स्नान केले आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकवरून एक्सवर महाकुंभमेळ्याचा एक फोटो शेअर केला आहे.

पेटिट यांनी काढलेल्या फोटोमध्ये, प्रयागराजचे संगम शहर चकमकत असलेले दिसत आहे.

उत्तर प्रदेशच्या माहिती विभागाने आता याबाबत माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२५ पर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. ही संख्या सतत वेगाने वाढत आहे.

महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी लाखो भाविक येत असतात. यावेळी मोठी गर्दी वाढणार आहे. यामुळे सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार अॅक्शनमोडवर आले आहे.

संगम किनाऱ्याला नो-फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे आणि परवानगीशिवाय ड्रोन उडवता येणार नाहीत. जर ड्रोन उडाला तर ड्रोनविरोधी यंत्रणा ते निष्क्रिय करेल. यासोबतच, टिथर ड्रोनद्वारे सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापन सुधारले जाईल.

प्रयागरामधील वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षेसाठी पाऊल उचलली आहेत.

सुरक्षेसोबतच, भारत आणि परदेशातून संगम शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा आणि मदत देखील केली जाईल. जेणेकरून तो चांगल्या अनुभवासह सुरक्षितपणे घरी परतू शकेल.