हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:47 IST2017-10-24T15:42:11+5:302017-10-24T15:47:17+5:30

हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनऊ-आग्रा महामार्गावर हवाईदलाच्या लढाऊ विमानांचं टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करण्यात आलं.
हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
लखनऊ-आग्रा हायवेवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एक-एक करुन लँडिंग केलं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड करण्यात आलं.
हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
भारतीय हवाई दलाने 'C-130 सुपर हर्क्युलिस' हे महाकाय मालवाहतूक विमान एक्सप्रेस वे वर उतरविले. एकप्रकारे हवाई दलाने या विमानाचे यशस्वी लँडिंग करुन दाखवण्याचा पराक्रम केला. 900 कोटी रुपये या विमानाची किंमत आहे. या विमानाच्या लँडिंगने सरावाला सुरुवात झाली.
हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते. 1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या.
हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
आधुनिक युद्धशास्त्रात लढाऊ विमानांना लँडिंग ग्राऊंड म्हणून एक्स्प्रेस वे आणि हायवे वापरण्यास तयार केलं जातं. फक्त भारतच नाही, तर पाकनेही 2000 मध्ये अशा प्रकारचं ड्रिल केलं होतं.
हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांनीही हा युद्धाभ्यास केला आहे.
हवाईदलाच्या लढाऊ विमानांचा लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास
मागच्यावर्षीही याच एक्सप्रेस वे वर विमानांनी उड्डाण आणि लँडिंगचा सराव केला होता. मागच्यावर्षी आठ लढाऊ विमाने इथे उतरली होती. वायुदलाच्या युद्धाभ्यासामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लखनौ-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता