By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:04 IST
1 / 10देशातील अनेक बड्या शहरांमध्ये LPG च्या तुटवड्यामुळे रेस्टॉरंट, फॅक्टरी आणि खानावळ यावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने लाकूड, कोळशावर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेत. चहा महाग झाला आहे. सिलेंडरसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. अमेरिका, इस्रायलविरुद्ध इराण युद्धाची झळ भारतापर्यंत पोहचली आहे. भारतात LPG गॅस तुटवड्याचे संकट येण्याची चिन्हे आहेत. परंतु सरकारने नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. एलपीजीचा तुटवडा भासणार नाही असा शब्द दिला आहे. त्याशिवाय देशात एस्मा कायदा लागू करत वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. 2 / 10बंगळुरू, पुण्यासारख्या शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. एजन्सीकडे पर्याप्त साठा नसल्याने लोकांना वाट पाहावी लागत आहे. व्यापाऱ्यांकडे केवळ २-३ दिवस पुरेल इतका गॅस शिल्लक आहे. या परिस्थितीमुळे जवळपास ८० टक्के हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे असं पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले. गॅस पुरवठा खंडीत झाल्याने वडापाव, चायनिज, अमृततूल्य चहासारखी दुकानांवरही परिणाम होऊ लागला आहे.3 / 10मेरठच्या औद्योगिक क्षेत्रात जवळपास ४७ हजार उद्योगांवर गॅस तुटवड्याचा परिणाम जाणवू लागला आहे. गॅस, प्लास्टिक कमतरतेमुळे शहरातील अनेक युनिट बंद व्हायची वेळ आली आहे. बागपत जिल्ह्यात गॅसच्या ३२ एजन्सी आहेत. ३५ फॅक्टरीमध्ये सिलेंडर नसल्याने काम बंद झाले आहे. मुरादाबादच्या रामपूर, अमरोहा, संबल जिल्ह्यात इंडियन गॅस सर्व्हिसने हॉटेल, रेस्टॉरंट यांना व्यावसायिक सिलेंडर पुरवठा थांबवला आहे.4 / 10मुंबई, नागपूर, पुणे याठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. पुणे महापालिकेने गॅस शवदाहिनी तात्पुरत्या बंद केल्या आहेत. राज्यात ९ हजारांहून अधिक रेस्टॉरंट आणि बारवर बंद होण्याचे सावट आहे. मुंबईत हॉटेल असोसिएशन आहारने सतर्कतेची सूचना केली आहे. जर पुरवठा सुरळीत झाला नाही तर पुढील २ दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल बंद होतील. मुंबईत काही रेस्टॉरंटने गॅस मिळत नसल्याने चूल आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे.5 / 10बंगळुरूतही हीच परिस्थिती आहे. गॅस पुरवठा झाला नाही तर हॉटेल बंद पडतील. काही वृद्ध, विद्यार्थी आणि रुग्णाचे नातेवाईक जेवणासाठी हॉटेलवर निर्भर असतात. त्यामुळे हॉटेल बंद झाले तर सर्वसामान्यांना त्याचा फटका बसेल. परंतु LPG पुरवठ्याबाबत कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. प्रत्येक कुटुंबाला महिन्याला एक घरगुती गॅस सिलेंडर मिळेल असं तेल कंपन्यांनी आश्वासन दिल्याचे कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री एच मुनियप्पा यांनी म्हटलं आहे.6 / 10झारखंडच्या रांची येथेही व्यावसायिक गॅस पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. झारखंडचे मंत्री इरफान अंसारी यांनी या मुद्द्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहिले आहे. जर उद्योग आणि हॉटेल यांना गॅस पुरवठा झाला नाही तर राज्यातील उद्योग ठप्प होतील आणि हजारो कामगारांच्या पोटचा घास हिरावला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.7 / 10कोलकातासह पश्चिम बंगालमधील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने राज्यात सगळीकडे पेट्रोल आणि डिझेल सामान्यत: उपलब्ध आहेत असं म्हटलं आहे. मात्र इंधनासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत असल्याची तक्रार वाहन चालकांची आहे.8 / 10अयोध्येत राम मंदिरातील सीता रसोई वगळता इतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मंदिरात प्रसाद म्हणून देणारे लाडू उत्पादन कमी झाले आहे. राम मंदिराजवळच अमावा मंदिरात २०१९ पासून निशुल्क भोजन दिले जायचे परंतु गॅस तुटवड्यामुळे तेदेखील बंद झाले आहे. 9 / 10मध्य प्रदेशातील इंदुर येथे किंमती वाढल्याने गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही. लग्नाच्या कालावधीत गॅस तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवले जात आहे. इंदूरच्या चाट चौपाटी असोसिएशनचे अध्यक्ष गुजन शर्मा यांनी आम्ही आधीच इलेक्ट्रिक साहित्य खरेदी केले आहे आणि त्याचा वापर करत आहोत असं म्हटलं आहे. जयपूरमध्ये हॉटेल, ढाबे आणि रेस्टॉरंटवाले व्यावसायिक गॅस सिलेंडरवर अवलंबून आहेत. ज्यातून जेवण बनवणे आता कठीण झाले आहे. गॅस तुटवड्यामुळे लग्नातील खर्च २५ ते ३० हजारांनी वाढू शकतो असं राजस्थान टेंट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी जिंदल यांनी म्हटलं. गॅस मिळत नसल्याने फॅक्टरीतील उत्पादन थांबू शकतात. 10 / 10हरियाणा येथेही अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत. भारत पेट्रोलियमकडे अंदाजे ७.१ दिवसांचा घरगुती पुरवठा साठा उपलब्ध आहे तर हिंदुस्तान पेट्रोलियमकडे अंदाजे ५.८ दिवसांचा स्टॉक आहे. पूर्वी घरगुती सिलिंडर एक ते दोन दिवसांत पोहोचवले जात होते, परंतु आता त्यासाठी एक आठवडा लागतोय. सध्या परिस्थिती सामान्य आहे. घाबरून जाण्याची गरज नाही असं हरियाणाचे अन्न पुरवठा मंत्री राजेश नागर यांनी सांगितले. राजधानी चंदीगडमध्येही एलपीजीचे संकट वाढत चालले आहे.