प्रियकराच्या पत्नीला प्रेयसी म्हणाली, 'संपूर्ण संपत्ती घे, पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 05:45 PM2020-05-01T17:45:42+5:302020-05-01T22:36:54+5:30

57 वर्षीय एक सरकारी महिला अधिकारी आपल्या ज्युनिअर 45 वर्षीय सहकाऱ्याच्या प्रेमात पडली. याच प्रेमापायी ही महिला एक दिवस त्याच्या घरी पोहोचली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या पत्नीला म्हणाली की, 'माझी संपूर्ण संपत्ती घे आणि तुझा पती मला दे'. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमधील आहे.

हे प्रकरण 17 एप्रिलनंतर भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात कौन्सिलिंगसाठी आले होते. या प्रकरणाचे कौन्सिलिंग करणाऱ्या कौन्सिलर सरिता राजानी यांनी याबाबतची माहिती दिली.

सरिता राजानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील सरकारी विभागात एका महत्त्वाच्या पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर तिच्या मुलाने आणि सुनेने सुद्धा तिला आपल्यापासून दूर केले. त्यानंतर या महिलेची आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याची जवळीक वाढत गेली.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे 25 मार्चपासून एकटी राहात असल्यामुळे तिला आपल्या प्रियकराची आठवण येत आहे. यामुळे ती 17 एप्रिलला प्रियकराच्या घरी पोहोचली. त्यावेळी स्वयंपाकघरात काम करणारी प्रियकराची पत्नी बाहेर आली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला.

प्रियकराच्या घरात गेल्यानंतर या महिलेने त्याच्या पत्नीला म्हटले की, 'माझी संपूर्ण संपत्ती घे, पण तुझा पती मला दे'. हे ऐकताच घरात एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर या महिलेचा मुलगा आणि सून त्याठिकाणी पोहोचले. त्यानंतर हे प्रकरण कौन्सिलिंगसाठी फॅमिली कोर्टात गेले.

जेव्हा पतीने आपल्या पत्नीला सांगितले की, आपण त्या महिलेला एकटे ठेवू शकत नाही. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच बिकट झाले. यावर पत्नीने म्हटले आहे की, की, 14 वर्षानंतर पतीने तिची फसवणूक केली आहे. ती त्याला कधीही माफ करू शकणार नाही. यानंतर दोन्ही बाजूने सातत्याने स्पष्टीकरण दिले जात आहे.

हे प्रकरण 1997 मध्ये आलेल्या 'जुदाई' चित्रपटासारखे दिसते. ज्यामध्ये उर्मिला मातोंडकर तिचा विवाहित सहकारी अनिल कपूरसोबत प्रेम करत असते. तसेच, ती अनिल कपूरची पत्नी श्रीदेवीकडे पैशाच्या बदल्यात अनिल कपूरची मागणी करते. त्याला श्रीदेवी होकार सुद्धा देते.