लेडी कॉन्स्टेबलचा Instagramवर 'जलवा'; एका व्हिडीओनं केलं जबरदस्त फेमस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:26 IST
1 / 8कोण कधी सोशल मीडियावर प्रसिद्ध होईल सांगू शकत नाही. मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याच्या डान्सची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तसेच लेडी कॉन्स्टेबल प्रियांका मिश्रा देखील इंस्टाग्रामवरील रीलने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. (All Photo -Instagram)2 / 8मुंबईतील पोलीस कर्मचारी अमोल कांबळे यांच्या डान्सने असंख्य लोकांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियांका मिश्रा देखील तिच्या रीलमुळे फेमस होताना दिसत आहे. 3 / 8प्रियांका मिश्रा पोलीस ठाण्यात हजर झाली खरी, पण तिचा तिच्या एका व्हिडीओने थैमान घातले आहे. सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.4 / 8सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. तसेच या लेडी कॉन्स्टेबलच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या फॉलॉव्हर्स आणि व्युव्हर्समध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 5 / 8प्रियांका मिश्रा यांच्या इंस्टाग्राम फॉलोव्हर्स संख्या दोन दिवसात जवळजवळ दुप्पट झाली आहे. फॉलोव्हर्स खूप वेगाने वाढत आहेत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्याची आवड असलेल्या प्रियंकाचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणखी बरेच व्हिडिओ आहेत.6 / 8 मात्र, ज्या व्हिडिओमुळे ती प्रसिद्ध झाली, तो व्हिडीओ आता हटवण्यात आला आहे. प्रियांका मिश्रा ही कानपूरची रहिवासी आहे. २०२० मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झाली होती.7 / 8तीन महिन्यांपूर्वी झाशीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रियांका आग्रा येथे ती कर्तव्यावर तैनात झाली होती. ती तीन महिने एमएम गेट पोलीस स्टेशनमध्ये तैनात होती. प्रियंकाला स्वतःचे व्हिडिओ बनवण्याची आवड आहे. तिचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. एप्रिल ते 25 ऑगस्टपर्यंत तिने ७६ व्हिडिओ अपलोड केले. यामध्ये काही मजेदार व्हिडीओ देखील पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये बनवण्यात आले होते. 8 / 8दोन व्हिडीओमध्ये ती शस्त्र दाखवताना दिसली. खात्यावर ३७०० फॉलोअर्स होते.